वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथे झालेल्या ३०व्या किशोर/किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत किशोर गटात ठाणे तर किशोरी गटात पुण्याने जेतेपदावर नाव कोरले. किशोरी गटाच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरचा कडवा प्रतिकार मोडून काढत पुण्याने २ गुण आणि ३.२० मिनिटे राखून विजय मिळवला.
पुण्यातर्फे स्नेहल पाटीलने ३.२० मिनिटे संरक्षण केले. मध्यंतराला ४-४ अशी बरोबरी होती. उत्तरार्धात प्रियांका इंगळेने ४.१० मिनिटे तर स्नेहल पाटीलने २.२० मिनिटे संरक्षण करत सामन्यावर प्रभुत्त्व मिळवले. त्यानंतरच्या आक्रमणात विजयासाठी आवश्यक गुण केवळ अडीच मिनिटांत मिळवत पुण्याने जेतेपदावर शिक्कामोर्तब
केले.
किशोर गटात ठाण्याने सोलापूर संघावर एक डाव आणि एका गुणाने मात केली. ठाण्यातर्फे आकाश तोरणेने २.३० मिनिटे, १.४० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. विनित राठोडने १.२० आणि ३ मिनिटे संरक्षण केले. शुभम उत्तेकरने १.३० मिनिटे संरक्षण करताना २ गडीही बाद केले.
ठाण्याच्या शुभम उत्तेकर आणि मुंबई उपनगरच्या आरती कदम यांची सवरेत्कृष्ट आक्रमणपटू म्हणून निवड झाली. सोलापूरच्या सौरभ स्वामी आणि पुण्याची स्नेहल
पाटील सवरेत्कृष्ट संरक्षक ठरले. ठाण्याचा आकाश तोरणे आणि पुण्याची प्रियांका इंगळे सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरले.

Story img Loader