भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही संघांच्या पदरी निराशा पडली़ पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत त्यांना अनुक्रमे सांगली व कोल्हापूरने पराभूत करून स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.
पुरुषांच्या पहिल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या सांगलीने मुंबई उपनगर संघाचा १५-१३ असा दोन गुण व ३.२० मि. राखून पराभव केला. सांगलीचे मिलिंद चावरेकर, उत्तम सावंत, दीपक माने व युवराज जाधव यांनी आपल्या खेळाची छाप पाडली. उपनगरच्या दीपेश मोरे, दीपक माधव व अक्षय भांगरे यांचे प्रयत्न तोकडे पडले. दुसऱ्या उपांत्य फेरीत कोल्हापूरने मुंबईवर१६-१५ अशी सामना संपायला केवळ ५० सेकंद बाकी असताना मात केली.
मुंबई संघांच्या पदरी निराशा
भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही संघांच्या पदरी निराशा पडली़ पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत त्यांना अनुक्रमे सांगली व कोल्हापूरने पराभूत करून स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.
First published on: 30-03-2015 at 01:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho mumbai loss