भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही संघांच्या पदरी निराशा पडली़  पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत त्यांना अनुक्रमे सांगली व कोल्हापूरने पराभूत करून स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.
पुरुषांच्या पहिल्या उपांत्य फेरीत गतविजेत्या सांगलीने मुंबई उपनगर संघाचा १५-१३ असा दोन गुण व ३.२० मि. राखून पराभव केला. सांगलीचे मिलिंद चावरेकर, उत्तम सावंत, दीपक माने व युवराज जाधव यांनी आपल्या खेळाची छाप पाडली. उपनगरच्या दीपेश मोरे, दीपक माधव व अक्षय भांगरे यांचे प्रयत्न तोकडे पडले. दुसऱ्या उपांत्य फेरीत कोल्हापूरने मुंबईवर१६-१५ अशी सामना संपायला केवळ ५० सेकंद बाकी असताना मात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho mumbai loss