ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटात मुंबई उपनगर, नाशिक, मुंबई, पुणे व सांगली तर महिला गटात मुंबई, उस्मानाबाद, मुंबई उपनगर, पुणे व ठाणे संघांनी उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
पुरुषांमध्ये उपनगरने रत्नागिरीचा १ डाव व १३ गुणांनी पराभव केला. दिपेश मोरे (४.३० मि. व २ बळी), अक्षय भांगरे (३ मि.) व नचिकेत जाधव (६ बळी) यांनी उपनगरकडून सुरेख खेळ केला. महिलांमध्ये मुंबईने जळगाववर १ डाव व १२ गुणांनी विजय मिळवला. मुंबईकडून दर्शना सकपाळ (४.२० मि.) व साजल पाटील, अनुष्का प्रभू व साक्षी पिळणकर यांनी प्रत्येकी २.४० मि. संरक्षण केले. ठाणे संघाने रायगडवर एक डाव आणि २१ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. ठाण्याच्या शीतल मोरेने ४ मिनिटे संरक्षण आणि ५ बळी मिळवत अष्टपैलू खेळ केला. पोर्णिमा सकपाळने ५ मि. तर पूजा भोपीने ४ मि. संरक्षण केले. शिल्पा जाधव, आरती कदम, मयुरी पेडणेकर, कविता गोलांबडे व श्रुती सकपाळ यांच्या सुरेख खेळामुळे मुंबई उपनगरने लातूरवर १ डाव व १४ गुणांनी मात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho mumbai suburb thane mumbai in semi final