चौथ्या भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष गटात मुंबई उपनगर, मुंबई, तर महिला गटात मुंबई उपनगर या संघांनी उपांत्य फेरी गाठली.
पुरुष गटात मुंबईने ठाण्याचा १६-१३ असा पराभव केला. रुपेश खेतले, श्रेयस राऊळ व प्रसाद राडिये यांनी उत्कृष्ट खेळ केला. मुंबई उपनगरच्या पुरुष संघाने उस्मानाबादवर १८-११ अशी एक डाव सात गुणांनी मात करून उपांत्य फेरी गाठली. उपनगरच्या दीपेश मोरे, दुर्वेश साळुंके, गणेश दळवी व किरण कांबळे यांनी सुरेख खेळ केला. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरने सातारा संघाला १३-९ असा पराभवाचा धक्का दिला. विजयी संघाकडून श्रुती सकपाळ, कविता गोलांबडे, मयूरी पेडणेकर व कीर्ती चव्हाण यांनी उत्तम खेळ केला.
मुंबईच्या दोन्ही संघांची घोडदौड कायम
चौथ्या भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष गटात मुंबई उपनगर, मुंबई, तर महिला गटात मुंबई उपनगर या संघांनी उपांत्य फेरी गाठली.
First published on: 29-03-2015 at 06:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho mumbai team win