चौथ्या भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष गटात मुंबई उपनगर, मुंबई, तर महिला गटात मुंबई उपनगर या संघांनी उपांत्य फेरी गाठली.
पुरुष गटात मुंबईने ठाण्याचा १६-१३ असा पराभव केला.  रुपेश खेतले, श्रेयस राऊळ व प्रसाद राडिये यांनी उत्कृष्ट खेळ केला.  मुंबई उपनगरच्या पुरुष संघाने उस्मानाबादवर १८-११ अशी एक डाव सात गुणांनी मात करून उपांत्य फेरी गाठली. उपनगरच्या दीपेश मोरे, दुर्वेश साळुंके, गणेश दळवी व किरण कांबळे यांनी सुरेख खेळ केला. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई उपनगरने सातारा संघाला १३-९ असा पराभवाचा धक्का दिला. विजयी संघाकडून श्रुती सकपाळ, कविता गोलांबडे, मयूरी पेडणेकर व कीर्ती चव्हाण यांनी उत्तम खेळ केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kho kho mumbai team win