गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी शिवाजी पार्कवर खो-खो प्रीमिअर लीग या फ्रँचाइजी आधारित संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. चपळता, वेग आणि कौशल्य या तिन्हीचे अनोखे मिश्रण असलेल्या खो-खोचा थरार अनुभवण्याची संधी यानिमित्ताने खो-खोरसिकांना मिळणार आहे.
सांगली स्मॅशर्स आणि अहमदनगर हीरोज यांच्यात स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे. ११ ते १४ एप्रिलदरम्यान सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात हे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी शिवाजी पार्क येथे प्रमोद गावंड क्रीडानगरी उभारण्यात आली आहे. राज्यभरातील अव्वल ७२ खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. मुंबई रायडर्स, सबर्बन योद्धाज, ठाणे थंडर्स, सांगली स्मॅशर्स, पुणे फायटर्स आणि अहमदनगर हिरोज असे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

Story img Loader