३१व्या किशोर-किशोरी सब-ज्युनिअर मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत ठाण्याला दुहेरी जेतेपदाची संधी आह़े  किशोर गटातील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ठाणे संघाने पुण्याचे कडवे आव्हान १६-१४ असे २ गुण व १० सेकंद राखून मोडीत काढत अंतिम फेरी गाठली.  ठाण्याच्या आकाश कदम, शैलेश आखाडे, आदित्य कांबळे व शार्दूल मेहतर हे विजयाचे प्रमुख शिलेदार होते. दुसऱ्या सामन्यात सांगलीने सोलापूरवर १३-१२ असा केवळ एका गुणाच्या फरकाने निसटता विजय मिळवला. किशोरी गटात ठाण्याने पुणे संघावर १६-१२ अशी मात केली.  ठाणे संघाच्या रेश्मा राणे, गीतांजली नरसाळे, पूजा फरगडे व दीक्षा सोनरुसकर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. अहमदनगरने सांगलीवर १३-१२ असा एक गुण व १.३० मि. राखून विजय संपादन केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मधल्या फळीला आणखी मेहनतीची गरज – मोरे
मुंबई : ‘‘सलग सहा विजयांसह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत ऐटीत प्रवेश केला असला तरी संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना आणखी मेहनत घेण्याची आवश्यकता आह़े,’’ असे मत निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केल़े  क्रीडा पत्रकार चंद्रेश नारायणन लिखित ‘वर्ल्ड कप हिरो’ या पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होत़े  

ट्रक शर्यत : स्टुअर्ट ऑलिव्हरने जेतेपद राखले
नोएडा : अटीतटीच्या शर्यतीत टीम कॅस्ट्रॉल वेक्टनच्या स्टुअर्ट ऑलिव्हरने टी-१ प्राएमा ट्रक शर्यतीचे जेतेपद राखल़े  एलिएड पार्टनरच्या स्टीव्ह थॉमस आणि टाटा टेक्नॉलॉजीच्या स्टीव्हन पॉवेल यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावल़े

बलजिंदरला कांस्य
नवी दिल्ली : भारताच्या बलिजदर सिंगने जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई चालण्याच्या स्पर्धेतील वीस कि़ मी़ शर्यतीत कांस्यपदक जिंकल़े