Kieron Pollard and Dwayne Bravo Video: मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) २०२३ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात एमआय न्यूयॉर्कने टेक्सास सुपर किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात एमआय न्यूयॉर्कने आपली पकड कोणत्याही क्षणी ढासळू दिली नाही आणि सहज विजय मिळवला. त्याचवेळी, सामन्यानंतर मैदानावर एक मजेदार घटना देखील पाहायला मिळाली, जेव्हा किरॉन पोलार्डने त्याच्या भेटीसाठी आलेल्या ड्वेन ब्राव्होची खिल्ली उडवली.

एमआय न्यूयॉर्कने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्हा ड्वेन ब्राव्हो सामना संपल्यानंतर पोलार्डला भेटायला आला, तेव्हा पोलार्डने हातवारे करून ब्राव्होची खिल्ली उडवली. यादरम्यान पोलार्डच्या बोलण्याला उत्तर देण्यासाठी ब्राव्होनेही त्याच्यासमोर नतमस्तक होऊन त्याला सलाम केला. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. या संपूर्ण क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

IND vs NZ Ravindra Jadeja cleverly run out William O Rourke in Pune test
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरच्या अचूक थ्रोवर रवींद्र जडेजाने हुशारीने विल्यम ओ रुकला केले रनआऊट, VIDEO व्हायरल
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Washington Sundar twice clean bowled Rachin Ravindra in IND vs NZ 2nd test
Washington Sundar : वॉशिग्टनची ‘अति’सुंदर गोलंदाजी, सलग दुसऱ्या डावात रचिन रवींद्रचा उडवला त्रिफळा, पाहा VIDEO
Washington Sundar 7 wickets and 5 batters bowled records in IND vs NZ 2nd Test
Washington Sundar : त्रिफळाचीत करत ७ विकेट्स आणि खास पराक्रम
Washington Sundar 6 Wickets in Test Take First Five wicket Haul in IND vs NZ With The best Spell
Washington Sundar: कानामागून आला आणि ‘सुंदर’ झाला; ७ विकेट्ससह किवींची उडवली भंबेरी
IND vs NZ Washington Sundar clean bowled Rachin Ravindra and Tom Blundell video viral
IND vs NZ : वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी! कर्दनकाळ रचिन रवींद्र पाठोपाठ टॉम ब्लंडेलचाही उडवला त्रिफळा, पाहा VIDEO
IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल
Ranji Trophy 2024 -25 Mumbai beats Maharashtra by nine wickets
Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय

ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड यांच्यात नेहमीच चांगली मैत्री पाहायला मिळते. जेव्हा चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०१५ च्या मोसमात ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर ब्राव्होने पोलार्डसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये त्याने आपण जास्त टी-२० ट्रॉफी जिंकल्याचे सांगताना पोलार्डचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलार्डला ब्राव्होने विमानाचा इशारा करत त्याला घरी जाण्यास सांगितले होते. या घटनेचा पोलार्डने बदला घेतला.

एमआय न्यूयॉर्कची अंतिम फेरीत सिएटल ऑर्कासशी लढत होईल –

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात, एमआय न्यूयॉर्क संघाला १५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी १९ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. संघाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेवाल्ड ब्रेविसने नाबाद ४१ धावा केल्या. याशिवाय सयान जहांगीरने ३६ आणि टीम डेव्हिडने ३३ धावा केल्या. आता अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्क संघाचा सामना सिएटल ऑर्कास संघाशी होणार आहे.