सध्याच्या घडीला भारतातील क्रिकेटपटू, खेळाडूंपासून ते सेलिब्रेटी उद्योगपतींपर्यंत सर्वचजण मुकेश अंबानींचा धाकटा लेक अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंगसाठी जामनगर येथे पोहोचले आहेत. या भव्यदिव्य अशा होणाऱ्या लग्नसोहळ्यासाठी अनेक भारतीय तसेच जगभरातील बड्या लोकांनी हजेरी लावली आहे. भारतीय संघाचा तसंच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मासह असंख्य क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित आहेत. याच संघाचा धाकड अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड पाकिस्तान सुपर लीग सोडून थेट जामनगरमध्ये दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालपर्यंत पाकिस्तानातील कराचीमध्ये पीएसल खेळत होता. तो पाकिस्तान सुपर लीग २०२४ मध्ये कराची किंग्जकडून खेळतो. पीएसएल स्पर्धेत कराची किंग्ज संघासाठी सर्वाधिक धावा पोलार्डच्या नावावर आहेत. त्याने आतापर्यंत १९६ धावा केल्या आहेत. २९ फेब्रुवारीला कराची किंग्जचा क्वेटा ग्लॅडिएटर्सशी सामना होता. या सामन्यानंतर तो १ मार्चला संध्याकाळी उशिरा गुजरातमधील जामनगरमध्ये पोहोचला. प्री वेडिंग सोहळा तीन दिवस चालणार आहे. कराची किंग्ज संघाचा पुढचा सामना रविवारी आहे. त्या सामन्यात खेळायचं असल्यास पोलार्डला जामनगरमधून लगेचच निघावं लागेल. दगदग होणार असली तरी पोलार्ड प्री वेडिंगसाठी आवर्जून उपस्थित आहे.

IPL मधून निवृत्ती –

मुंबई इंडियन्सच्या आधारवड खेळाडूंपैकी पोलार्ड एक आहे. आयपीएल कारकीर्दीत तो सगळी वर्ष मुंबई इंडियन्स संघाकडूनच खेळला. मुंबई इंडियन्स कुटुंबाचा तो अविभाज्य भाग आहे. आयएल ट्वेन्टी२० स्पर्धेत मुंबई एमिरेट्स तसंच मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत एमआय न्यूयॉर्क संघाचं पोलार्ड नेतृत्व करतो. मुंबई इंडियन्स स्पर्धेत पोलार्ड प्रशिक्षक चमूचा भाग आहे.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : यशस्वी जैस्वाल एक धाव काढताच रचणार इतिहास, गावसकर-गूचचा विक्रमही धोक्यात!

मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडू जामनरगमध्ये दाखल –

पोलार्ड व्यतिरिक्त, क्रीडा जगतातील सर्व बड्या व्यक्तींनी अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती. ज्यात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, इशान किशन, झहीर खान, सूर्यकुमार यादव, हार्दिक आणि कृणाल पंड्या यासारख्या क्रिकेटपटूंचा समावेश होता.

हेही वाचा – Elections : युवराज सिंग भाजपच्या तिकिटावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार का? ‘सिक्सर किंग’ने दिले उत्तर

अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्याला मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या वेगवेगळ्या लीगमधील क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली होती. त्यात टीम डेव्हिड, ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, रशीद खान आणि ट्रेंट बोल्टसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. अनंतच्या प्री-वेडिंगला उपस्थित राहण्यासाठी खेळाडूंव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकारांसह अनेक परदेशी पाहुणेही भारतात पोहोचले आहेत.