भारतीय संघाच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष किरण मोरेंनी व्यक्त केली शक्यता
भारतीय संघात शिखर धवन आणि रोहीत शर्मा ही नवी सलामीजोडी सध्या उत्कृष्ट खेळत असली तरी, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे संघात केव्हाही पुनरागमन होऊ शकते असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) भारतीय संघ निवडीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी स्पष्ट केले.
किरण मोरे म्हणाले,”सध्या भारतीय क्रिकेटमध्ये संघात स्थान मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे. जो उत्तम कामगिरी करेल त्याला भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य होते. सध्याच्या संघात कोणत्याही खेळाडूची कामगिरी खालावली तर गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग तसेच जहीर खानचे सुद्धा संघात पुनरागमन होऊ शकते यात काही शंका नाही. कारण, चांगल्या कामगिरीबरोबर संघाला अनुभवाचीही गरज असते. असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
गंभीर-सेहवाग जोडीचे संघात पुनरागमन होऊ शकते
भारतीय संघाच्या निवडसमितीचे माजी अध्यक्ष किरण मोरेंनी व्यक्त केली शक्यता भारतीय संघात शिखर धवन आणि रोहीत शर्मा ही नवी सलामीजोडी सध्या उत्कृष्ट खेळत असली तरी, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे संघात केव्हाही पुनरागमन होऊ शकते असे
First published on: 14-07-2013 at 01:10 IST
TOPICSक्रिकेट न्यूजCricket Newsगौतम गंभीरGautam GambhirबीसीसीआयBCCIमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniरवींद्र जडेजाRavindra Jadejaरोहित शर्माRohit Sharmaशिखर धवनShikhar Dhawanस्पोर्ट्स न्यूजSports News
+ 4 More
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran more wary of confining gambhir sehwag to history