गॅरी कर्स्टन यांच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत आला असून, त्याचे नूतनीकरण करण्याऐवजी आपल्या पदापासून ते मुक्त होणार आहेत, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने शुक्रवारी जाहीर केले आहे. भारताला एकदिवसीय क्रिकेटमधील जगज्जेतेपद मिळवून देण्याची किमया साधणाऱ्या कर्स्टन यांनी त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत परतण्याचा निर्णय घेतला होता. मग ऑगस्ट २०११मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी ते दोन वर्षांसाठी करारबद्ध झाले आणि त्यांनी या संघाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचवले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, कर्स्टनने कौटुंबिक कारणास्तव संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्स्टन यांनी संघटनेचे आभार मानले आहेत.

Story img Loader