Kuldeep Yadav hits back at troll after getting abused on X : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवचे ट्विटरवर एका यूजरला दिलेले आश्चर्यकारक उत्तर व्हायरल होत आहे. २०२३ (नोव्हेंबर १९) मध्ये एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर एका वर्षानंतर, कुलदीपला सोशल मीडिया यूजरने लक्ष्य केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात कुलदीपला एकही विकेट मिळाली नव्हती. त्याने १० षटकात ५६ धावा दिल्या होत्या फायनलमध्ये भारताला सहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये कुलदीपच्या कामगिरीवर जोरदार टीका करण्यात आली आणि त्याच्याविरोधात काही चुकीचे शब्द वापरले गेले. त्या एक्समध्ये युजरने कुलदीपला शिवीगाळही केली. त्यानंतर कुलदीप यादवने स्वतः युजरच्या एक्स पोस्टला उत्तर दिले. कुलदीपने लिहिले, ‘सर तुमची समस्या काय आहे? इतकं सुंदर लिहिण्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले की काही वैयक्तिक वैमनस्य आहे?’

कुलदीपची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी –

कुलदीप यादवने संपूर्ण एकदिवसीय विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. त्याच्यासमोर मोठमोठे दिग्गज गुडघे टेकताना दिसले होते. मात्र, फायनल सामन्यात कुलदीपची जादू चालली नाही. यादवने विश्वचषकातील ११ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या. एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाने सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांना फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा – IND vs AUS: रिंकू सिंगचे ५ चेंडूत ५ षटकार खाल्लेल्या गोलंदाजाला मिळाली ऑस्ट्रेलियावारीची संधी

u

u

कुलदीप यादव सध्या जर्मनीत आहे. म्युनिक येथे त्याच्या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याच कारणामुळे त्याची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवड झाली नाही. अनेक दिवसांपासून तो या समस्येशी झुंजत होता आणि आता त्याला उपचार घ्यावे लागले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड करताना, बीसीसीआयने सांगितले होते की, कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडीसाठी उपलब्ध नाही. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर, दीर्घकालीन समस्येच्या निराकरणासाठी त्याला बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पाठवण्यात आले होते.

हेही वाचा – IND vs AUS : भारताचे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत वर्चस्व! पण ऑस्ट्रेलियात कसा आहे हेड टू हेड कसोटी रेकॉर्ड? जाणून घ्या

कुलदीपची यादवची कारकीर्द –

२९ वर्षीय कुलदीप यादवने भारतीय संघासाठी आतापर्यंत १३ कसोटी, १०६ एकदिवसीय आणि ४० टी-२० सामने खेळले आहेत. कुलदीपच्या नावावर कसोटीत ५६, वनडेत १७२ आणि टी-२० मध्ये ६९ विकेट्स आहेत. याशिवाय, मेगा लिलावापूर्वी कुलदीपला त्याच्या आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सनेही कायम ठेवले आहे. कुलदीपने ८४ आयपीएल सामन्यात ८७ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो अखेरचा खेळताना दिसला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kis cheez ki dikkat hai aapko itna pyara likhne ke liye paise mile ya koi kuldeep yadav hits back at troll after getting abused on x vbm