KKR appoints Shreyas Iyer as captain : आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने मोठी घोषणा केली आहे. आयपीएलचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्सने मोठी खेळी केली आहे. गौतम गंभीरच्या टीम कोलकाताने नितीश राणाकडून कर्णधारपद काढून घेत ही जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवली आहे. त्यामुळे केकेआरचा संघ मजबूत झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कर्णधार कोण आहे, जाणून घेऊया.

श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी –

भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या वर्षी श्रेयसच्या दुखापतीमुळे नितीश राणा कडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र आता अय्यर दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. अय्यरने विश्वचषकातही अप्रतिम कामगिरी केली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तो भारतीय संघाचा भाग आहे. अशा परिस्थितीत कोलकाताने पुन्हा एकदा ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली आहे. याशिवाय नितीश राणाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अय्यर आणि राणा यांच्या नावाची घोषणा करताना कोलकाता नाईट रायडर्सने सांगितले की, श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधील स्पर्धा खेळू शकला नाही, परंतु आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दुखापतीतून परतण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
maharashtra assembly election 2024 raj thackeray rally in pune
‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…
Uddhav Thackeray questioned cotton prices and whether farmers happy with current situation
शेतकरी सुखी आहे का ? उद्धव ठाकरे यांचा प्रश्न
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

नितीश राणाच्या नेतृत्त्वाखाली केकेआर संघाची कामगिरी –

संघ व्यवस्थापनाने पुढे सांगितले की, अय्यरच्या दुखापतीनंतर नितीश राणानेही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. नितीशने केवळ खेळाडूच नाही, तर कर्णधार म्हणूनही संघासाठी चांगली कामगिरी केली होती. आता राणा उपकर्णधार असल्याने अय्यरला कर्णधारपदासाठी खूप मदत होईल यात शंका नाही. त्याचवेळी कर्णधार झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, आयपीएलचा शेवटचा हंगाम आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. मी दुखापतीमुळे संघाबाहेर होतो, अशा परिस्थितीत नितीश राणाने संघाला चांगल्या पद्धतीने हाताळले. संघाने नितीश राणा यांची उपकर्णधारपदी निवड केली आहे, हा योग्य निर्णय आहे, राणा त्यास पात्र आहे.

हेही वाचा – IND vs SA: टीम इंडियाच्या विजयात पाऊस ठरू शकतो व्हिलन, कसे असेल जोहान्सबर्गचे हवामान आणि खेळपट्टी? जाणून घ्या

आयपीएल २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये केकेआर सातव्या क्रमांकावर होता. त्याने १४ सामने खेळले आणि ६ जिंकले. केकेआरलाही ८ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रिंकू सिंगने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. रिंकूने १४ सामन्यात ४७४ धावा केल्या होत्या. या काळात त्याने ४ अर्धशतके झळकावली. रिंकूची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद ६७ धावा आहे.