KKR has shared a video of Rinku Singh’s amazing catch: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा रिंकू सिंग सोळाव्या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. रिंकूने आपल्या वेगवान फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत मने जिंकली होती. त्यामुळे आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी काही दिवसात जाहीर होणाऱ्या टी-२० संघात रिंकू सिंगची निवड होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी रिंकू सिंग एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अप्रतिम झेल घेताना दिसत आहे.

रिंकू सिंगचा हा व्हिडीओ त्याच्या आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सनेच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू सिंग निळ्या जर्सीमध्ये सराव करताना दिसत आहे. रिंकू झेलचा सराव करत आहे. या दरम्यान रिंकूने सरावात डायव्हिंग करून अतिशय नेत्रदीपक झेल घेतला. या झेलबद्दल रिंकूचे कौतुक झाले. तसेच या व्हिडीओमध्ये, रिंकू व्हिडीओ आला असेल तर सांग, असे म्हणताना ऐकू येत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आयपीएलमध्ये रिंकू सिंगने केला कहर –

आयपीएल २०२३ च्या हंगामात रिंकू सिंगची बॅट खूपच तळपली होती. त्याने केकेआरसाठी अनेक फिनिशिंग इनिंग्स खेळल्या. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रिंकूने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. ज्यामुळे तो रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला.

हेही वाचा – WI vs IND: “आपण सर्व एकाच…”, विराट कोहलीने कसोटी मालिकेपूर्वी शेअर केलेल्या दोन इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

आयपीएल २०२३ मधील रिंकू सिंगची कामगिरी –

रिंकू सिंगने १४ सामन्यात ५९.२५ च्या सरासरीने आणि १४९.५३च्या स्ट्राईक रेटने ४७४ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतके झळकली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ६७* धावा होती.

Story img Loader