भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवणाऱ्या धोनीचा जुना फोटो कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोवरून धोनीला ट्रोल करण्यात आले. केकेआरच्या या पोस्टवर धोनीच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एवढेच नव्हे, तर भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेही असे उत्तर दिले, की तो ट्विटरवर ट्रेंड करू लागला.

कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी एक जुना फोटो पोस्ट करून धोनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. धोनी आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे कर्णधारपद सांभाळत होता, तेव्हाचा हा फोटो आहे. पुण्याचा संघ आता आयपीएलचा भाग नाही. चेन्नई सुपर किंग्जला लीगमधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले तेव्हा, पुणे फ्रेंचायझी लीगमध्ये सहभागी झाली आणि धोनीने त्याचे कर्णधारपद स्वीकारले.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

केकेआरने दोन फोटोंचा कोलाज केला आहे. एक फोटो सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा आहे, तर दुसरा आयपीएलमधील जुन्या सामन्यातील आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सिडनी येथे सुरू असलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या पाचव्या दिवशी, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील उर्वरित दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी आपले सर्व क्षेत्ररक्षक जवळ खेळपट्टीच्या जवळ घेतले होते. दुसऱ्या डावात इंग्लंडने ९ विकेट गमावल्या होत्या, पण दिवसाचा खेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला. धोनी पुण्याचे कर्णधारपद सांभाळत असताना आणि फलंदाजी करताना केकेआरने असेच क्षेत्ररक्षण सजवले होते आणि हाच फोटो केकेआरने कोलाजमध्ये घेतला.

धोनीच्या चाहत्यांना ही तुलना आवडली नाही आणि त्यांनी या पोस्टवर कमेंट करायला सुरुवात केली. या पोस्टवर जडेजाने आपल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्या सामन्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे, त्या सामन्यात गौतम गंभीर केकेआरचे कर्णधारपद सांभाळत होता आणि त्याने आपले सर्व क्षेत्ररक्षक धोनीच्या जवळ आणले होते. तेव्हा पीयूष चावला केकेआरसाठी गोलंदाजी करत होता कारण धोनीला लेग स्पिन खेळणे अवघड जात होते. त्यामुळे गंभीरने हा निर्णय घेतला होता.
केकेआरने लिहिले, ”एक क्षण जो तुम्हाला कसोटी क्रिकेटचा क्लासिक बनण्यापासून टी-२० क्रिकेटच्या मास्टर स्ट्रोकची आठवण करून देतो.” जडेजाने उत्तरात लिहिले, ”हा मास्टर स्ट्रोक नव्हता, फक्त एक शो ऑफ होता.”

यावर कमेंट करताना एका युजरने धोनीचा आयपीएल ट्रॉफी हातात घेतलेला फोटो पोस्ट केला. त्याच वेळी, आणखी एका यूजरने धोनीचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो केकेआरविरुद्ध मोठा शॉट खेळताना दिसत आहे. आणखी एका युजरने गंभीरचा वैयक्तिक स्कोअर ‘०’ दाखवत असलेला फोटोही पोस्ट केला आहे.

हेही वाचा – Novak Djokovic: नोव्हाक जोकोव्हिचने खटला जिंकला, ऑस्ट्रेलिया सरकारला मोठा झटका; सर्व सामान परत करण्याचा आदेश

धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे आणि लीगमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यापेक्षा जास्त वेळा फक्त मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीने या लीगमध्ये २२० सामने खेळले असून एकूण ४७४६ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर २३ अर्धशतके आहेत.

Story img Loader