भारतीय क्रिकेट टीमचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. या वर्षाच्या शेवटी ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून त्याची तयारीदेखील सुरु असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाबाबत आता नवी माहिती समोर आली आहे. अथिया शेट्टीच्या जवळच्या मित्राने ही जोडी या वर्षी लग्न करणार नसल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने दिल्या खास शुभेच्छा, व्हिडीओ शेअर करत…

अथिया शेट्टीच्या जवळच्या मित्राने ‘बॉम्बे टाईम्स’शी बोलताना राहुल आणि अथिया यांच्या लग्नावर मोठे भाष्य केले आहे. त्याने या दोघांचे यावर्षी लग्न होणार नसल्याचे म्हटले आहे. “या वर्षी त्यांचे लग्न होणार नाही. अथिया या वर्षी दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये गुंतलेली आहे. हे दोन्ही प्रोजेक्स वेगवेगळ्या कालावधित सुरु होणार आहेत. तर दुसरीकडे आता टी-२० विश्वचषक येत आहे. त्यामुळे केएल राहुल यावर्षी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये गुंतलेला असणार आहे. या दोघांकडेही लग्न करण्यासाठी वेळ कुठे आहे ?” असे या मित्राने म्हटले आहे.

हेही वाचा >>> इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : नो-बॉलप्रकरणी कारवाई!; दिल्लीच्या पंत, शार्दूलला दंड, तर साहाय्यक प्रशिक्षक अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी

दरम्यान, केएल राहुलचा १८ एप्रिल रोजी नुकताच वाढदिवस झाला. यावेळी अथियाने राहुलसोबतचा फोटो शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या. तर अथियाने पोस्ट केलेल्या फोटोवर राहुलनेदेखील लव्ह यू म्हणत दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची एका प्रकारे कबुलीच दिली. त्यानंतर ही जोडी या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाऊ लागले. विशेष म्हणजे ही जोडी साऊथ इंडियन पद्धतीने विवाह करणार असल्याची चर्चा आहे.