KL Rahul Kane Williamson No ball: सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये तीन मोठे कसोटी सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आणि तिसरा कसोटी सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेड कसोटी सामना आणि न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्यात चाहत्यांना योगायोगाने एक सारखीच घटना पाहिली ज्यावर विश्वास बसणार नाही.
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये सारखीच घटना फार कमी वेळा पाहायला मिळते. ॲडलेड आणि वेलिंग्टनमध्ये आज म्हणजेच ६ डिसेंबर रोजी कसोटी सामना सुरू झाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला.
यशस्वी बाद झाल्यानंतर राहुल अत्यंत सावधपणे खेळताना दिसला पण जेव्हा त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर आलेला स्कॉट बोलँडचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंडूने बॅटची कड घेत थेट विकेटकिपरच्या हातात गेला. यानंतर राहुल बाद झाल्याने पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला होता. तितक्या तिसऱ्या पंचांनी नो-बॉल घोषित केले. राहुल बाद होण्यापासून वाचला तेव्हा भारतीय वेळेनुसार सकाळी १०.१२ वाजले होते.
राहुलच्या नो बॉल नाबाद राहिलेल्या घटनेच्या अवघ्या १२ मिनिटांपूर्वी, वेलिंग्टन कसोटी सामन्यातही अशीच घटना दिसली होती, जिथे केन विल्यमसन देखील ब्रेडन कार्सच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर नो-बॉलमुळे बचावला होता.
ॉ
हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे कारण?
केएल राहुल आणि केन विल्यमसन या दोघांनाही नो-बॉलवर जीवदान मिळाल्याचा फायदा उठवता आला नाही आणि दोघही फलंदाज प्रत्येकी ३७ धावा करत बाद झाले. राहुलने ६४ चेंडूंत ३७ धावा, तर विल्यमसन ५६ चेंडूंचा सामना केल्यानंतर बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारची समान घटना क्वचितच चाहत्यांना पाहायला मिळते.