KL Rahul Athiya Shetty charity venture for Schools : क्रिकेटपटू केएल राहुल त्याची पत्नी अथिया शेट्टी भारतीय क्रिकेटपटूंच्या वस्तू विकणार आहेत. केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा यामागे खूप उदात्त हेतू आहे. केएल राहुल त्याच्या पत्नीसह रोहित शर्मा, एमएस धोनी आणि राहुल द्रविडची बॅट, विराट कोहलीचे हातमोजे, जसप्रीत बुमराहची जर्सी आणि त्याच्या अनेक वस्तूंचा लिलाव आयोजित करणार आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे श्रवणदोष आणि बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांना मदत करण्यासाठी करत आहेत.
केएल राहुल करणार लिलाव –
केएल राहुल आणि अथिया विप्ला फाउंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. फाऊंडेशन पूर्वी सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया म्हणून ओळखले जात होते. त्यांचे बीकेसी, मुंबई येथे असलेल्या विशेष गरजू शाळांना मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विराट कोहली, एमएस धोनी, राहुल द्रविड, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा व्यतिरिक्त अनेक परदेशी क्रिकेटपटूंच्या क्रीडा साहित्यांचा समावेश केला आहे.
परदेशी क्रिकेटपटूचा सहभाग –
परदेशी क्रिकेटपटूंपैकी जोस बटलर, क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे. विप्ला फाउंडेशन सुनील शेट्टी आणि त्यांचे कुटुंब चालवते. आता अथिया शेट्टीशी लग्न केल्यानंतर केएल राहुल देखील त्याचा एक भाग बनला आहे. केएल राहुल जेव्हा शाळेत त्या मुलांना भेटला तेव्हा तो खूप भावूक झाला होता. त्यानंतर केएल राहुलने यांना मदत करण्यासाठी विप्ला फाउंडेशनसह पुढाकार घेतला आहे.
हेही वाचा – IND vs SL : दुसऱ्या वनडेपूर्वी संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर
केएल राहुल काय म्हणाला?
दरम्यान, केएल राहुलने सांगितले की, मी या शाळेला पहिली भेट दिली, तेव्हा खूप भावुक झालो होतो. येथील मुलांनी मला या महान कार्यासाठी शक्य तितके योगदान देण्यासाठी प्रेरित केले, ज्यामध्ये अथियाचे कुटुंब एक भाग होते. जेव्हा याबाबत मी क्रिकेटपटूंशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी या महान कार्यासाठी त्यांच्या मौल्यवान क्रिकेट वस्तू दान करण्यास तितकेच सहकार्य केले.
हेही वाचा – IPL 2025 : मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला मेगा ऑक्शनपूर्वी सोडणार? ‘या’ चार खेळाडूंना ठेवणार कायम
कोणाच्या वस्तूला किती किंमत –
काही न्यूज रिपोर्टच्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लिलावात एमएस धोनीच्या बॅटची मूळ किंमत ३.५ लाख रुपये ठेवली आहे. रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या बॅटची किंमतही त्याने तेवढीच ठेवली आहे. केएल राहुलच्या जर्सीचा लिलाव एक लाख रुपयांपासून सुरू होईल, तर विराट कोहलीच्या ग्लोव्हजची किंमत ५० हजार रुपये आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहच्या जर्सीची किंमत ५० हजार रुपये ठेवण्यात आली आहे, तर केएल राहुलने त्याच्या हेल्मेटची किंमत ५० हजार रुपये ठेवली आहे. इतर क्रिकेटपटूंच्या वस्तूही लिलावात विकल्या जातील.