भारतीय टी २० संघाचा उपकर्णधार आणि सलामीचा फलंदाज केएल राहुल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. टी २० वर्ल्डकप स्पर्धेतून टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी सुपर १२ फेरीत केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली होती. दुसरीकडे, केएल राहुल सोशल मीडियावरही सक्रिय असतो. केएल राहुल आणि मयंक अग्रवालची मैत्री सर्वश्रूत आहे. बालदिनाचं औचित्य साधत मयंक अग्रवालने लहानपणीचा फोटो शेअर इन्स्टाग्रामवर शेअर केला. मयंकचा हा फोटो पाहताच केएल राहुलला लहानपणी असलेली सवय आतापर्यत कायम असल्याचं निदर्शनास आलं. बॅटने चेंडू मारताना मयंक अग्रवालचा बोट वर असल्याचं दिसलं. केएल राहुलने लागलीच त्याखाली कमेंट्स लिहीली.

“मोठी स्वप्न पाहा, कठोर परिश्रम करा आणि ते प्रत्यक्षात आणा. सर्व लहान मुलांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा”, अशी पोस्ट लिहित मयंक अग्रवालने लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो केएल राहुलने पाहिल्यानंतर ड्राईव्ह खेळताना पायाचे बोट हवेत ठेवण्याच्या मयंकच्या सवयीकडे लक्ष वेधलं. “बोट अजूनही वर आहे भाऊ”, अशी कमेंट केएल राहुलने केली.

केएल राहुलने फोटोला कमेंट देतात मयंक अग्रवालनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “जे तुमच्याकडे नैसर्गिकरित्या आलं आहे, ते तुम्ही बदलू शकत नाही”, असा रिप्लाय मयंक अग्रवालने दिला. मयंक अग्रवालची न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. रोहित शर्माला कसोटीसाठी आराम देण्यात आला आहे. त्यामुळे कसोटीत सलामीला केएल राहुल आणि मयंक अग्रवाल जोडी मैदानात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader