KL Rahul Controversial Dismissal IND vs AUS 1st test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतसा. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुल चांगली फलंदाजी करत होता. पण या सामन्यात २६ धावांवर तो वादग्रस्तरित्या बाद झाला. ऑस्ट्रेलियाने झेलबाद असल्याचे आवाहन केल्यानंतर सुरुवातीला मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. पण तिसऱ्या पंचांनी सर्व अँगलने नीट शाहनिशा न करता राहुलला बाद घोषित केले.

मिचेल स्टार्कच्या २३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केएल राहुल स्ट्राईकवर होता. राहुल या सामन्यात उत्कृष्ट बचावात्मक फलंदाजी करत होता वेळप्रसंगी चेंडू पाहून चांगले कव्हर ड्राईव्हही खेळत होता. ऑस्ट्रेलियाने स्टार्कच्या दुसऱ्या चेंडूवर झेलबाद असल्याचे आवाहन केले आणि मैदानावरील पंचांनी बाद न दिल्याने कमिन्सने रिव्ह्यू घेतला. सुरूवातील चेंडू राहुलच्या पॅडला लागल्याचे दिसत होते. मात्र यानंतर कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने रिव्ह्यू घेतला, त्यानंतर तिसऱ्या पंचांना चेंडू राहुलच्या बॅटला स्पर्श झाल्याचे आढळले आणि स्निकोमीटरवर एजेसही दिसून आले यासह राहुलला बाद देण्यात आले.

IND vs AUS Why was Washington Sundar picked ahead of Ashwin and Jadeja in Perth Test of Border Gavaskar Trophy
IND vs AUS: अनुभवी अश्विन आणि जडेजाऐवजी पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड का करण्यात आली? काय आहे कारण?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election quiz
Election Quiz: महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण? उत्तर द्या आणि जिंका भारी स्मार्टफोन
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!

हेही वाचा – IND vs AUS: अनुभवी अश्विन आणि जडेजाऐवजी पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड का करण्यात आली? काय आहे कारण?

जेव्हा केएल राहुलला तिसऱ्या पंचांनी वादग्रस्तपणे बाद घोषित केले, तेव्हा समालोचाही आश्चर्यचकित झाले. दुसरीकडे केएल राहुलचाही या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जातानाही तो बॅट दाखवत सांगण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा – IND vs AUS: भारताकडून नितीश रेड्डी-हर्षित राणाचे कसोटीत पदार्पण, जसप्रीत बुमराहने प्लेईंग इलेव्हन जाहीर करत दिला धक्का

केएल राहुलच्या विकेटवरून वाद का पेटला?

तिसऱ्या पंचांनी बाद झाल्याचे दृश्य पाहिल्यानंतर मैदानी पंचांना निर्णय बदलावा लागला. महत्त्वाचं म्हणजे पंचांनी पाहिलेल्या दृश्यांमध्ये चेंडू पॅडला लागून यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये गेला की राहुलच्या बॅटला आदळल्यानंतर यष्टीरक्षकाने झेल टिपला हे स्निकोमीटरमध्ये स्पष्ट झाले नाही. सहसा, जेव्हा या प्रकरणाबद्दल शंका असते तेव्हा निर्णय फलंदाजाच्या बाजूने असतो. पण तसं काही झालं नाही. तिसऱ्या अंपायरने ज्या फुटेजमधून काहीही स्टष्ट होत नव्हते ते पाहून राहुलला आऊट दिले.

हेही वाचा – Virendra Sehwag Son: जैसा बाप वैसा बेटा! सेहवागच्या लेकाचे वादळी द्विशतक, आर्यवीरने ३४ चौकार २ षटकारांसह केली तुफानी फटकेबाजी

पर्थमधील तिसऱ्या पंचाच्या निर्णयानंतर केएल राहुलचा चेहराही पडला होता. राहुलविरोधातील या निर्णयावर मैदानाबाहेरही टीका होत आहे. ज्यात चेतेश्वर पुजारा, मॅथ्यू हेडन सांगतात की, राहुल आऊट आहे हे सांगण्याइतका व्हिडिओ स्पष्ट नाही. तर वसीम अक्रमने थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये सांगितले की अंपायरने अंधारात बाण सोडला आहे. तर हर्षा भोगले, रॉबिन उथप्पा, मुरली कार्तिक या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताने लंच ब्रेकपर्यंत ४ विकेट्स गमावत ५१ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पड्डिकल शून्यावर बाद झाले. तर विराट कोहली ५ धावा आणि केएल राहुल ३ चौकारांसह २६ धावा करत बाद झाला.