KL Rahul Injured and walks off field in India’s Simulation Session: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी संघ पर्थमध्ये सराव करत आहे. तर भारताच्या अ संघाबरोबर सराव सामनाही खेळत आहे. पण या सामन्यात केएल राहुलला दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती आणि मग वेदना होत असल्याने फिजिओच्या सल्ल्यावरून त्याला मैदानाबाहेर जावे लागले. राहुलची दुखापत टीम इंडियासाठी मोठा धक्का असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

KL राहुलला शुक्रवारी म्हणजे आज WACA मैदानावर भारताच्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यादरम्यान उजव्या कोपरला दुखापत झाली. यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. दुखापतीची तीव्रता अद्याप कळू शकलेली नाही, मात्र त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. इंट्रा-स्क्वॉड सामन्यात केएल राहुलने यशस्वी जैस्वालसह सलामी दिली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा न खेळल्यास केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल हे पर्थमध्ये सलामीला उतरतील, हे संकेत आहे. केएल राहुल २९ धावा करून खेळत होता. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचा एक चेंडू त्याच्या उजव्या कोपरावर आदळला. या सामन्यात राहुल शॉर्ट बॉलही चांगला खेळत होता.

हेही वाचा – Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

दुखापतीनंतर केएल राहुल खूप टीम फिजिओचा सल्ला घेतल्यानंतर मैदान सोडावे लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांचा हवाला देत पीटीआयने लिहिले की, ‘केएल राहुलला नुकतीच दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या कोपराची दुखापती किती गंभीर आहे हे कळण्यासाठी वेळ लागेल.

हेही वाचा – १० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम

केएल राहुल कसोटीत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीनंतर प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याची निवड झाली नव्हती. बेंगळुरूच्या खेळाडूने डिसेंबर २०२३ मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर त्याने नऊ डावांत केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत.

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

दरम्यान, सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की स्टार फलंदाज विराट कोहलीने दुखापतीबाबत गुरुवारी १४ नोव्हेंबला स्कॅन केले होते. मात्र, कोहली या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात खेळत होता. विराट कोहली या सामन्यात १५ धावा करून बाद झाला. गोलंदाज मुकेश कुमारच्या चेंडूवर विराट कोहली दुसऱ्या स्लिपवर झेलबाद झाला. यानंतर विराट कोहलीने जवळपास अर्धा तास नेटमध्ये सराव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul injured in intra squad match simulation session perth walks off field for scanning ahead border gavaskar trophy ind vs aus bdg