KL Rahul is set to return to the Indian team soon after his thigh surgery: भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६ व्या मोसमात झालेल्या दुखापतीमुळे, राहुल केवळ हंगामाच्या मध्यभागीच बाहेर पडला नाही. त्याचवेळी त्याला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही आपले स्थान गमवावे लागले होते. पण आता तो लवकरात लवकर मैदानात परतणार आहे.

आयपीएलच्या १६व्या हंगामात केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार म्हणून चांगली जबाबदारी पार पाडत होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीला दुखापत झाल्याने त्याला बाहेर पडावे लागले. यानंतर राहुलवर शस्त्रक्रिया करावी लागली.

Shivraj Rakshe
Shivraj Rakshe : “…म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला”, शिवराज राक्षेने सांगितलं मॅटवर नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
accident on Bandra Worli Bridge
दोन वर्षांपूर्वीचा वांद्रे-वरळी सेतूवरील विचित्र अपघात; मानिसक आजाराने ग्रस्त कार चालकाला उच्च न्यायालयाकडून जामीन
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Pune Mumbai Bangalore bypass road accident news update in marathi
भरधाव मोटार बसवर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात

आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या प्रक्रियेत पुढे गेला आहे. १३ जूनपासून केएल राहुल नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये त्याच्या रिहॅब प्रक्रियेला सुरुवात करेल. यानंतर तो २०२३ च्या आशिया कपमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतू शकतो. एकदिवसीय विश्वचषक २०२३ पाहता लोकेश राहुलचे पुनरागमन ही टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी मानली जाऊ शकते. कारण राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावू शकतो.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: शुबमन गिलच्या वादग्रस्त झेलवर रिकी पाँटिंगची प्रतिक्रिया, म्हणाला, “ऑस्ट्रेलियातील प्रत्येकाला वाटेल की…”

केएल राहुलची वनडे क्रिकेटमधील कामगिरी –

लोकेश राहुलने ११ जून २०१६ रोजी भारतीय संघातर्फे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. राहुलने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात राहुलने शानदार शतकी खेळी खेळताना सामनावीराचा किताबही पटकावला. भारतीय संघाने हा सामना ९ विकेटने जिंकला होता. आतापर्यंत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत, राहुलने ५४ सामन्यांत ४५.१३ च्या सरासरीने १९८६ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतकांचा समावेश आहे.

Story img Loader