भारतीय क्रिकेटपटू लोकेश राहुल त्याच्या खराब फॉर्ममुळे सतत चर्चेत असतो. तो बराच काळ देशासाठी मोठी खेळी खेळू शकला नाही आणि इंदोर कसोटीत त्याला संघातून वगळण्यात आले. त्‍याच्‍या जागी शुबमन गिलला संधी देण्‍यात आली, पण गिललाही दोन्ही डावांत विशेष काही करता आले नाही. दरम्यान, लोकेश राहुल आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. लोकेश राहुलने त्याच्या आयपीएल संघ लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सी लॉन्च करताना सांगितले की, स्ट्राइक रेटवर जास्त जोर दिला जातो.

राहुलच्या या वक्तव्यानंतर चाहते सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या खराब स्ट्राईक रेटमुळे काही लोक त्याला ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याशी अनेकांनी सहमती दर्शवली आहे. त्याचबरोबर त्याने फलंदाजीतील फॉर्मबाबत देखील आपले मत व्यक्त केले. फॉर्मविषयी बोलताना तो म्हणाला की, “ फलंदाजीतील तंत्रावर मी काम करतो आहे पण खेळपट्ट्या या फिरकीला अधिक मदत देणाऱ्या असल्याने अशावेळी फलंदाजांना फार काही स्कोप नसतो.”

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
Mohanji Bhagwat expressed his concern about the decline in the country population
चारा नाही; तर चोचही नकोच!

हेही वाचा: IND vs AUS: टर्निंग पिचवर खेळता येत नाहीये? अहमदाबाद टेस्ट आधी सुनील गावसकरांनी टीम इंडियाला दिला खास गुरुमंत्र

जर्सी लॉन्च इव्हेंटमध्ये लोकेश राहुलला विचारण्यात आले की टी२० क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट किती महत्त्वाचा आहे. यावर तो म्हणाला की, फलंदाजाला कोणत्या स्ट्राईक रेटने खेळायचे आहे, हे लक्ष्यावर अवलंबून आहे. “मला वाटते की स्ट्राइक रेट ओव्हररेट झाला आहे. पण ते परिस्थितीवर अवलंबून आहे, जसे की तुम्ही १४०चा पाठलाग करत असाल तर तुम्हाला २०० वर स्ट्राइक करण्याची गरज नाही. हे सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे,” तो म्हणाला.

लखनऊ फ्रँचायझीचा मार्गदर्शक गौतम गंभीर देखील जर्सी लॉन्च कार्यक्रमात उपस्थित होता. राहुलबद्दल बोलताना गंभीर म्हणाला की, “त्याच्यासारखा ‘शांत स्थिर डोक्याचा’ कर्णधार मिळाल्याने आमचा संघ भाग्यवान आहे.” राहुलच्या भारतीय संघातील स्थानावर गेल्या काही महिन्यांपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकेश राहुलला खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.

हेही वाचा: Team India Holi Celebration: धुळवडीच्या रंगात रोहित-विराट दंग! त्यानंतर बसमध्ये कोहलीने केला भांगडा, होळी सेलिब्रेशनचा Video व्हायरल

केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी

राहुलचा आयपीएलमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. टी२० लीगच्या १०९ सामन्यांमध्ये सलामीवीराने ४८.०१ च्या सरासरीने आणि १३६.२२ च्या स्ट्राइक रेटने ३८८९ धावा केल्या आहेत. राहुल आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे, परंतु त्याने आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी एकाही फ्रँचायझीसोबत टी२० ट्रॉफी जिंकलेली नाही.

Story img Loader