India vs South Africa 1st Test Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या सामन्यासाठी सराव सुरू केला आहे. रविवारी भारताच्या विकेटकीपिंग सराव सत्रात के.एस. भरतचा समावेश नव्हता, त्यादरम्यान के.एल. राहुल विकेटकीपिंग करताना दिसला. आता पहिल्या कसोटीसाठी राहुल सराव सत्रात सामील झाल्यानंतर, रोहित शर्मा पहिल्या कसोटीत राहुलकडे के.एस. भरतच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवेल असे दिसते. काही काळापासून ऋषभ पंत आणि राहुलच्या दुखापतीमुळे के.एस. भरतची कसोटीत यष्टिरक्षणासाठी निवड केली जात होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इनसाइडस्पोर्टने आधी दिलेल्या वृत्तानुसार, के.एल. राहुल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीत विकेटकीपिंगमध्ये पदार्पण करेल. के.एस. भरतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याची संधी होती पण, फलंदाजीत तो करू शकला नाही. इशान किशनलाही संधी होती मात्र, तोही अपयशी ठरला. ऋद्धिमान साहाच्या बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ के.एल. राहुलकडे वळला आहे. मात्र, वेगवान गोलंदाजाची बॅटरी निवडणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, दोन वेगवान गोलंदाजांच्या स्थानासाठी तीन गोलंदाजांमध्ये चुरस आहे.

जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार असून त्याच्यासह मोहम्मद सिराजचे स्थान निश्चित आहे. मात्र, याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात वेगवान गोलंदाजांसाठी दोन जागा रिक्त आहेत. खेळपट्टी आणि वेग लक्षात घेता भारताला चार वेगवान गोलंदाजांसह जायला नक्कीच आवडेल. ही जागा भरण्यासाठी भारताकडे शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णासारखे गोलंदाज आहेत आणि या तिघांपैकी एकाची निवड करणे भारतीय संघ व्यवस्थापनासाठी सोपे काम होणार नाही.

शार्दुल ठाकूर

शार्दुल ठाकूरसाठी हे वर्ष कसोटी सामन्यांच्या दृष्टीने चांगले राहिले नाही. अष्टपैलू खेळाडूने २०२३मध्ये केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो केवळ ३ विकेट्स घेऊ शकला आहे. मात्र, ठाकूर भारतीय संघाला खालच्या क्रमाने फलंदाजीचा पर्यायही देऊ शकतो. भारताने सुरुवातीच्या फळीत रवींद्र जडेजाच्या रूपात फिरकीपटू निवडल्यास शार्दुलला पहिल्या कसोटीत दुसरा अष्टपैलू म्हणून संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

प्रसिध कृष्णा

प्रसिध कृष्णाने अद्याप कसोटीत पदार्पण केलेले नाही. मात्र, या वेगवान गोलंदाजाने महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध भारत अ संघासाठी चांगली कामगिरी केली. २७ वर्षीय गोलंदाजाने १८.१ षटके टाकत ४३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. या काळात त्याने ६ निर्धाव षटकेही टाकली होती. अशा स्थितीत प्रसिध कृष्णा सध्या तिसरा गोलंदाज होण्याच्या शर्यतीत पुढे आहे.

हेही वाचा: IPL Auction 2024: आयपीएलमुळे सुरक्षा रक्षकाचा मुलगा झाला करोडपती; म्हणाला, “आता देशासाठी खेळेन अन् वर्ल्ड कप…”

मुकेश कुमार

मुकेश कुमार हा भारतीय संघातील असा गोलंदाज आहे, जो एक आश्वासक खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. त्याने आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. जुलैमध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मुकेशने दोन विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, सध्या मुकेश कुमार खेळाच्या मैदानात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत थोडासा उतरलेला दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत भारत अ संघासाठी प्रशाशाची कामगिरी पाहता, त्याला प्राधान्यक्रमात मागे ठेवले जाऊ शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul or ks bharat in ind vs sa 1st test know who will get the chance as wicket keeper avw