भारतीय कसोटी संघातील सलामीवीर आणि कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केएल राहुलला उपचारासाठी जर्मनीला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. त्यानुसार आता केएल राहुल जर्मनीला रवाना झाला आहे. राहुलने आपल्या अधिकृत ट्विर अकऊंटवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. सोबतच त्याने चाहत्यांकडे शुभेच्छा आणि आशिर्वादाची मागणी केली आहे.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच त्याच्या दुखापतीने डोके वरती काढले. त्यामुळे त्याला पाच सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले. त्यानंतर त्याला जर्मनीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा – ‘त्या’ कसोटी दरम्यान मैदानावरच रडला होता भारतीय गोलंदाज, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने सांगितल्या आठवणी

त्यानुसार, केएल राहुल जर्मनीला पोहचला आहे. राहुलने ट्विटरवर स्वतःचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो पांढरा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे. अनेक चाहत्यांनी त्याला लवकरच तंदुरुस्त होऊन मैदानात परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे. राहुल उपचाराच्या बहाण्याने अथिया शेट्टीसोबत जर्मनीला गेला असल्याच्या कमेंट काही युजर्सनी केल्या आहेत. अथिया शेट्टी राहुलसोबत जर्मनीला गेली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी टीकाकार राहुलला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा – बूम बूम आफ्रिदीचे भारतीय क्रिकेटबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला…

कर्नाटक आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेल्या राहुलने आतापर्यंत ४३ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ५६ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यावर्षी फेब्रुवारीपासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. लोकेश राहुल वेळेत दुखापतीतून सावरला नाही तर तो २०२२च्या टी २० विश्वचषकाला मुकू शकतो. जर्मनीत उपचार घेतल्यानंतर राहुलला वेळेत मैदानात परतावे लागेल आणि स्वत:ची फिटनेस सिद्ध करावी लागेल. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते.

Story img Loader