KL Rahul Retirement Viral Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने गुरुवारी अचानक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. राहुलच्या नावाची एक इंस्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल झाली. या स्टोरीमध्ये केएल राहुलने निवृत्ती जाहीर केल्याचे लिहिले आहे. या व्हायरल इन्स्टा स्टोरीने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पण राहुलच्या या निवृत्तीच्या इन्स्टाग्राम स्टोरीमागचे नेमके काय सत्य आहे, जाणून घ्या.
KL Rahul सोशल मीडियावर अचानक चर्चेत आला. याचे कारण म्हणजे त्याने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी. केएल राहुलने एक स्टोरी शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की त्याला काहीतरी नवीन घोषणा करायची आहे. यानंतर, अचानक त्याच्या युझरनेमची आणखी एक स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यात राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, राहुलने निवृत्ती घेतल्याच्या चर्चेत तथ्य नाही.
हेही वाचा – Cristiano Ronaldo: फुटबॉलनंतर आता युट्युबवरही रोनाल्डोचा खास विक्रम, अवघ्या ९० मिनिटांत मिळवलं गोल्डन बटण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये केएल राहुलचा डिस्प्ले फोटो, त्याचं युझरनेम होता आणि समोरच्या बाजूला व्हेरिफाईड ब्लू टिक देखील होते. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘खूप विचार घेतल्यानंतर मी माझ्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सोपे नाही कारण वर्षानुवर्षे हा खेळ माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. मी माझे कुटुंब, मित्र, संघ आणि चाहत्यांचा आभारी आहे.
हेही वाचा – Australia U19 Women’s Squad: भारतीय वंशाच्या लेकी कांगारू संघात, पाहा कोण आहेत या खेळाडू?
केएल राहुलच्या इन्स्टाग्राम स्टोरीचा व्हायरल होत असलेला हा स्क्रिनशॉट खोटा आहे. खरंतर केएल राहुलने अशी कोणतीही स्टोरी शेअर केलेली नाही. पण काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याची इन्स्टाग्राम स्टोरी मात्र त्याने नक्कीच शेअर केली आहे. या स्टोरीनंतर सोशल मीडियावर त्याने निवृत्ती घेतल्याची खोटी पोस्ट व्हायरल करण्यात आली.
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलने आपल्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत ५० कसोटी, ७७ एकदिवसीय आणि ७२ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २८६३ धावा, एकदिवसीय सामन्यात २८५१ धावा आणि टी-२० मध्ये २२६५ धावा केल्या आहेत. KL ने कसोटीत ८ शतके, वनडेमध्ये ७ आणि टी-२० मध्ये २ शतके झळकावली आहेत.