India vs Bangladesh 2nd Test Scorecard in Marathi: भारत वि बांगलादेश कसोटीत भारतीय संघाने आक्रमक फलंदाजीने धावा करत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कानपूर कसोटीतील पहिले ३ दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे हा कसोटी सामना ड्रॉ होण्याची चिन्हे होती. पण भारताने चौथ्या दिवशीचा खेळा सुरू झाल्यानंतर झटपट बांगलादेशला ऑल आऊट केले आणि फलंदाजीसाठी उतरल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत भारताने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. इतकेच नव्हे तर यासह भारताने सर्वात जलद कसोटीत ५० आणि १०० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. पण यादरम्यान रोहित शर्माच्या संदेशाने संघात पुन्हा कशी उभारी आणली याबद्दल केएल राहुलने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने चौथ्या दिवशी सहकाऱ्यांना आक्रमक फलंदाजी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रोहित शर्माच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि त्याच्या रणनितीमुळे पावसामुळे ड्रॉ होत असलेल्या कसोटीत भारत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताने आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारत कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचे पहिल्याच २ चेंडूंवर २ दणदणीत षटकार, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असं काही

रोहित शर्माच्या मेसेजने भारताच्या विजयाच्या आशा केल्या पल्लवित

कानपूर कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी Sports18 शी बोलताना, राहुलने सांगितले की, मर्यादित वेळ शिल्लक असतानाही रोहितच्या संदेशाने संघाला सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रेरित केले. रोहित शर्माबद्दल बोलताना केएल म्हणाला “सुरुवातीपासूनच संदेश अगदी स्पष्ट होता. पावसामुळे, खराब हवामानामुळे आधीच बरेच दिवस वाया गेले होते. परंतु आम्ही उरलेल्या वेळेत काय करू शकतो यावर संपूर्ण लक्ष होते. आम्ही खूप लवकर काही विकेट गमावले पण रोहित शर्माचा मेसेज खूप स्पष्ट होता. आपण आऊट झालो तरी काही हरकत नाही, पण आपण विजयासाठी प्रयत्न केले.”

हेही वाचा – IND vs BAN: ऋषभमुळे विराट रनआऊट होता होता वाचला; कोहलीचा रुद्रावतार पाहून पंत जवळ गेला अन्… VIDEO व्हायरल

कानपूरमध्ये पावसामुळे पूर्ण दोन दिवसांचा खेळ रद्द झाल्यानंतर आठ गमावलेल्या सत्रांनंतर चौथ्या दिवशी अखेरीस सामना पुन्हा सुरू झाला. विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांच्या हातात ६ सत्र होती. खेळपट्टीने गोलंदाजांनाही थोडीशी मदत केली आणि भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला २३३ धावांत गुंडाळले, मोमिनुल हकने नाबाद १०७ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा हवेत झेपावत एकहाती झेल; गिलने धरलं डोकं तर कोच झाले चकित, पाहा VIDEO

भारताने त्यानंतर टी-२० स्टाईलमध्ये फलंदाजी करत प्रति षटक ८.२२ धावा या नेट रन रेटने धावा केल्या. या आक्रमक फलंदाजीसह भारतीय संघाने सर्वात वेगवान ५० (१८ चेंडू), १०० (७४ चेंडू), आणि २०० धावा (२४.२ षटके) यासह अनेक कसोटी विक्रम मोडले. भारताने आपला दुसरा डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला आणि आपल्या गोलंदाजांना आक्रमणाची आणखी एक संधी देण्याचे लक्ष्य ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul reveals how rohit sharma clear message revived hopes in team india for victory in ind vs ban 2nd test bdg