KL Rahul, IND vs ENG Rajkot Test : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के. एल. राहुल राजकोट कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये येत्या १५ मार्चपासून राजकोट येथे मालिकेतला तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. राहुलऐवजी निवड समितीने कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल याचा संघात समावेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघ आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताने १-१ अशी बरोबरी केली आहे. मालिकेतल्या पहिल्या सामन्यात खेळताना राहुलला दुखापत झाली होती. राहुलच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली होती. राहुल अद्याप पायाच्या दुखण्यातून सावरलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात निवड समितीने देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. याद्वारे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. तर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचं संघात पुनरागमन झालं आहे. परंतु, बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की जडेजा फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्यांचा अंतिम ११ जणांच्या संघात समावेश केला जाईल.

विराट कोहलीपाठोपाठ भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरदेखील मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. बीसीसीआय त्याच्या सुधारणेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हे ही वाचा >> U19 WC Final : कर्णधाराचा ‘तो’ निर्णय अन् भारताने विश्वचषक गमावला, मोहम्मद कैफने केलं पराभवाचं विश्लेषण

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), के. एस. भरत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप ( खेळाडूंचा प्लेईंग ११ मधील समावेश फिटनेस टेस्टवर अवलंबून आहे)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul ruled out of third ind vs eng test devdutt padikkal will replace asc
Show comments