KL Rahul’s reaction after the win : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ८ गडी राखून जिंकला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या दोन वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले आहे. त्याने सामन्यानंतर सांगितले की, स्पिनर्सचा लवकर वापर करण्याची आपली रणनीती होती, परंतु येथे फक्त वेगवान गोलंदाज पुरेसे ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ११६ धावांवर गारद झाला. येथे अर्शदीपने पाच आणि आवेश खानने चार विकेट घेतल्या. नंतर, श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शनच्या झटपट अर्धशतकांमुळे भारतीय संघाने १७ व्या षटकातच लक्ष्य गाठले. पाच वर्षांनंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत वनडे जिंकली आहे. टीम इंडियाने शेवटचा २०१८ मध्ये सेंच्युरियनच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यानंतर २०२२ मध्ये सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.

साामन्यातील विजयानंतर बोलताना केएल राहुल म्हणाला, ‘गेल्या वेळी मी येथे कर्णधार म्हणून तिन्ही वनडे सामने गमावले होते. आज दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याविरुद्ध सामना जिंकून छान वाटत आहे. या सामन्यात लवकरच गोलंदाजीसाठी फिरकीपटूंचा वापर करण्याची योजना होती, पण सुरुवातीला खेळपट्टीत चांगली हालचाल होती आणि आमच्या वेगवान गोलंदाजांनी त्याचा फायदा घेतला आणि चांगली कामगिरी केली.”

हेही वाचा – IND vs SA 1st ODI : ‘शेर सिंग राणा को हराएगा तू? है दम?’, टीम इंडियाच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवची इन्स्टा स्टोरी व्हायरल

प्लेइंग इलेव्हनमध्ये होणाऱ्या वारंवार बदलांवरही राहुलचे भाष्य –

यावेळी केएल राहुलने भारतीय संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांशी संबंधित प्रश्नाचे उत्तरही दिले. तो म्हणाला, “गेल्या काही वर्षांत असेच क्रिकेट खेळले जात आहे. खूप क्रिकेटमुळे तुम्हाला खेळाडूंना एक एक करून विश्रांती द्यावी लागते. प्रत्येक खेळाडूला एक किंवा दोन फॉरमॅट प्राधान्याने ठेवावे लागतात. बरं, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच संधी मिळते. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू प्रथम श्रेणीपासून आयपीएलपर्यंत चांगली कामगिरी करत आहे.”