IND vs ENG Match Today: रविवारी लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक २०२३ सामन्याआधी केएल राहुलने पत्रकार परिषदेत स्वतःच्या रिकव्हरीच्या कालावधीतील अनुभव शेअर केला आहे. राहुल म्हणाला की, “मी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागल्यापासून लोक काय म्हणतात याचा माझ्यावर होणारा परिणाम कमी झाला आहे. मी कोणाचं म्हणणं मनाला लावून घेत नाही. मी कणखर झालो आहे. त्याशिवाय रोहित शर्माने मला दिलेला एक सल्ला माझ्यासाठी खूप कामी आला आहे.”

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असणाऱ्या राहुलला दुखापतीमुळे २०२३ चे आयपीएल सीझन अर्धवटच सोडावे लागले होते. त्यानंतर लोकांच्या बोलण्याचा आपल्या मनावर कसा परिणाम झाला याविषयी राहुल सांगतो की, “मला असं वाटत होतं की लोक काय बोलतील याचा मला फरक पडत नाही पण गेल्या वर्षभरात माझ्यावर या गोष्टींचा खूप परिणाम होऊ लागला. यातून बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. मानसिकदृष्ट्या तुम्हाला बळकट होण्यासाठी कणखर असणे आवश्यक आहे. शिवाय जसे फलंदाजी तज्ज्ञ आहेत, गोलंदाजी तज्ज्ञ आहेत, तसेच मानसिक तज्ज्ञ सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांची मदत तुम्ही नक्कीच घेऊ शकता.”

a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Piyush Chawla response to Prithvi Shaw his retirement
Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Wasim Jaffer on Shikhar Dhawan Retirement
Shikhar Dhawan : ‘जितक्या कौतुकासाठी पात्र होता तेवढे कौतुक कधीच…’, धवनबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, तो संघहिताला…
Tim Southee on MS Dhoni
Tim Southee : टिम साऊदीला धोनीचं आयुष्य जगायचंय, न्यूझीलंडच्या कर्णधाराने व्यक्त केल्या मनातील भावना; काय आहे नेमकं कारण?
Rohit Sharma react on bat selection process
Rohit Sharma : “मी ‘हे’ करत नाही पण संघातील खेळाडू…”, रोहित शर्माने सांगितलं ड्रेसिंग रुममधलं गुपित, बॅट निवडीवर म्हणाला…
Brother and sister fight on Raksha Bandhan
राखी बांधू देत नाही म्हणून भावाचे केस ओढले, बहीण भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशीच भिडले, पाहा Viral Video

आशिया कप दरम्यान, राहुलने BCCI.TV ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मांडीच्या दुखापतीबद्दल खुलासा केला होता. “बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना मला दुखापत झाली आणि माझे टेंडन निखळले. हॅमस्ट्रिंग पूर्ण फाटले होते, माझे टेंडन माझ्या क्वाड्रिसिप्सपासून वेगळे झाले होते.”

जेव्हा यातून राहुल रिकव्हर होत होता तेव्हा प्रक्रियेत त्याने फलंदाजीपेक्षा त्याच्या कीपिंगवर कसे अधिक काम केले याबद्दलही सांगितले होते, तो म्हणाला, “रिकव्हरी दरम्यान मला असे वाटले की यष्टिरक्षणात तरबेज होण्यासाठी सुद्धा मला अधिक वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. खरंतर हे अन्य सर्व कौशल्यांसारखंच आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जितका सराव कराल, मेहनत घ्याल तितके त्यात अधिक तरबेज व्हाल. मी विकेटकीपिंगला गांभीर्याने घेत आहे कारण या परिस्थितीत प्रत्येक भूमिकेचे तंत्र परफेक्ट असणे आवश्यक आहे आणि मला सगळ्या आवश्यक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत.”

हे ही वाचा<< “मी ‘त्या’ कटू आठवणी विसरायचा प्रयत्न करतोय पण..”, IND vs ENG सामन्याआधी के. एल राहुलने व्यक्त केली खंत

दरम्यान, रोहित शर्माच्या सल्ल्याविषयी सांगताना राहुलने म्हटले की, “रोहितच्या गाईडबुक प्रमाणे मागील काही महिन्यांमध्ये मी सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला होता ज्यामुळे इतरांच्या बोलण्याचा स्वतःवर फरक न पडू देण्यासाठी खुप मदत झाली.”