KL Rahul shared a video of him practicing batting and wicketkeeping: भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे अंतिम वेळापत्रक आले नसले, तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी नक्कीच आली आहे. खरं तर, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने बुधवारी नेटवर सराव सुरू केला आहे, म्हणजेच तो लवकरच भारतीय जर्सीमध्ये दिसू शकतो.

राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजीसोबत विकेटकीपिंगचा सराव करताना दिसत आहे. आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी राहुलचे नेटवर पुनरागमन हे भारतीय संघासाठी चांगले संकेत आहेत. विशेषत: जेव्हा टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संघाबाहेर आहे आणि तो लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) चे नेतृत्व करत असलेल्या राहुलला स्पर्धेदरम्यान मांडीला दुखापत झाली होती. त्याच्यावर मे महिन्यात यशस्वी शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर तो पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे आहे, जिथे त्याने आता नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे. १९ जुलै रोजी बरे झाल्यानंतर त्याने फलंदाजीच्या सराव सत्राचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता. बुधवारी त्याने विकेटकीपिंगचा सरावही सुरू केला. दुखापती असूनही, ३१ वर्षीय खेळाडू अजूनही यष्टीरक्षक-फलंदाजांच्या स्थानासाठी पहिल्या क्रमांकाचा दावेदार आहे.

आतापर्यंत असे मानले जात होते की, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या सोशल मीडिया अपडेट्समुळे ते आशिया कपपर्यंत तंदुरुस्त होतील. तसेच विश्वचषकासाठीही निवडीसाठी उपलब्ध होतील, पण आता त्याच्या फिटनेसबाबत बीसीसीआय कोणतीही घाई करू इच्छित नाही, असे आतल्या सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – WTC Points Table: टीम इंडियाने फक्त एक सामना जिंकत मारली बाजी! इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

वृत्तानुसार, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकापूर्वी तंदुरुस्त झाले नाही, तर आशिया चषकात त्यांच्या जागी इतर खेळाडू घेण्याची शक्यता आहे. यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत इशान आणि संजूने चांगली कामगिरी केली आहे.

Story img Loader