मुंबई : भारताचा तारांकित सलामीवीर केएल राहुलच्या करोना चाचणीचा अहवाल गुरुवारी सकारात्मक आला. त्यामुळे २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) गुरुवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीनंतर मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने राहुलबाबतची माहिती दिली. राहुलवर नुकतीच जर्मनी येथे शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा विचार झाला नाही. त्यानंतरच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, तो या मालिकेत खेळण्याबाबत साशंकता आहे.