रोहित शर्माला भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवल्यानंतर आता या फॉरमॅटमध्ये संघाचा उपकर्णधार कोण असेल हा प्रश्न आहे. भारतीय एकदिवसीय संघाच्या नव्या उपकर्णधाराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, केएल राहुलला वनडेमध्ये संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

इनसाइड स्पोर्ट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केएल राहुलला दक्षिण आफ्रिका मालिकेपासून वनडे आणि टी-२० या दोन्ही फॉरमॅटमध्ये नियमितपणे संघाचा उपकर्णधार बनवले जाईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ”केएल राहुल पुढील उपकर्णधार असेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधारपदासाठी त्याची पहिली पसंती आहे. गेल्या काही वर्षांत त्याची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्याच्याकडे अजून ६-७ वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि तो पुढचा कर्णधार म्हणून तयार होऊ शकतो. संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविडसारखे दिग्गज आहेत आणि त्यामुळे त्यांना खूप काही शिकण्याची संधी मिळणार आहे.”

हेही वाचा – ‘‘रोहित शर्मा हा नेहमी…”, विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रवी शास्त्रींचं ‘मोठं’ वक्तव्य; एकदा वाचाच!

विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले असून त्याच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने याआधीच टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे. कोहली आता फक्त कसोटी सामन्यांमध्येच कर्णधार दिसणार आहे.

केएल राहुल आयपीएलच्या गेल्या चार हंगामात चांगली कामगिरी करत आहे आणि त्याने प्रत्येक वेळी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१ बद्दल बोलायचे तर त्याने १३ सामन्यात ६३ च्या सरासरीने ६२६ धावा केल्या. तो एकदिवसीय आणि टी-20 या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

Story img Loader