Sunil Gavaskar on Team India: आशिया चषकाच्या तिसऱ्या सामन्यात शनिवारी (२ सप्टेंबर) भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. अ गटातील या आवृत्तीतील भारताचा हा पहिलाच सामना आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ आपला दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याने नेपाळचा पराभव केला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सामन्याआधी सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज के.एल. राहुलबाबत सूचक विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा स्टार फलंदाज के.एल. राहुलची आशिया चषक २०२३ साठी टीम इंडियात निवड झाली आहे, मात्र दुखापतीतून पूर्णपणे बरा न झाल्याने तो आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याने सांगितले होते की, “मी खेळणार नाही.” पण या सगळ्यात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी राहुल २०२३च्या विश्वचषकापूर्वी कोणताही सामना खेळणार नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: IND vs PAK: बाबर आझमचे विराट कोहलीशी केलेल्या तुलनेबाबत मोठे विधान; सामन्यापूर्वी म्हणाला, “त्याच्याकडून खूप काही…”

सुनील गावसकर यांच्या आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खुलासा केला की, आशिया चषकाचे उर्वरित सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेमुळे राहुलला विश्वचषकाच्या तयारीसाठीही वेळ मिळेल. मात्र, माजी अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांना वाटते की, “पुढील महिन्यात मायदेशात होणाऱ्या विश्वचषक २०२३ साठी राहुलवर सट्टा लावणे निवडकर्त्यांसाठी कठीण परिस्थिती असेल.” सुनील यांच्या मते, “राहुल हा ‘क्लासी’ खेळाडू आहे, अशा खेळाडूची संघात निवड करणे धोक्याचे ठरेल ज्याला विश्वचषक सुरू होण्यापूर्वी महिनाभर एकही सामना खेळायला मिळणार नाही.”

सुनील गावसकर पुढे म्हणाले, “मला वाटते की ही एक कठीण परिस्थिती आहे कारण जर तो ५ सप्टेंबरपूर्वी गेम खेळत नसेल तर तुम्ही त्याच्या स्थितीचे मूल्यांकन कसे कराल? कारण मॅच सराव ही एक गोष्ट आहे आणि मॅच फिटनेस ही दुसरी गोष्ट आहे. त्यामुळे निवड समितीसाठी हा कठोर निर्णय असेल असे मला वाटते.” लिटिल मास्टर पुढे म्हणाले, “तुम्हाला पहिल्या दोन सामन्यांमध्येच उत्तर मिळू शकेल. अशा परिस्थितीत तुम्हाला राहुलच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधावा लागेल, ते दु:खदायक असेल पण हे वास्तव आहे. भारतीय संघाने ते स्वीकारायला हवे. अजून किती पाठिशी घालणार?” असा संतप्त सवाल केला.

हेही वाचा: IND vs PAK: रवी शास्त्रींनी श्रेयस अय्यर-जसप्रीत बुमराहबाबत केले मोठे विधान; म्हणाले, “दो साल से क्या झक…”

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधारक), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kl rahul will not play any match before the world cup sunil gavaskars shocking statement avw