भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने टी-२० वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध दमदार खेळी केली. त्याने स्कॉटिश गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सामन्यादरम्यान स्ट्ँड्समध्ये उपस्थित होती. अथियाने सामन्यादरम्यान राहुलला चिअर केले. ५ नोव्हेंबर हा अथियाचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्याने आपल्या अर्धशतकी खेळीने अथियाला खास गिफ्ट दिले.
यासोबतच राहुलने सामन्यानंतर आपल्या प्रेमाची कबुली दिली. राहुलने फेसबुकवर एक फोटो पोस्ट करत अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने अथियासोबतचा फोटो पोस्ट केला. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये अथियासोबतचे नाते जगासमोर आणले. गेल्या काही दिवसांपासून अथिया राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते सतत एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. काही दिवसांपूर्वी त्यांचा इंग्लंडमध्ये फिरतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता. पण त्या दोघांनीही अद्याप उघडपणे यावर वक्तव्य केलेले नव्हते. पण आता राहुलने अथियासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
हेही वाचा – T20 WC : केएल राहुलची बॅटिंग पाहून गर्लफ्रेंड अथिया घायाळ..! तुफानी अर्धशतकामुळं मिळालं ‘बर्थडे गिफ्ट’
अथिया ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. तिने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही दिसली. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोड्यांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नगाठसुद्धा बांधली आहे. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे.