कोलकाता : केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज अशा दुहेरी भूमिकेसाठी मेहनत घेत आहे. मात्र यासाठी त्याने कोणतीच तक्रार केलेली नाही. कारण त्याची प्राथमिकता ही अंतिम एकादशमध्ये आपले स्थान कायम ठेवण्याकडे आहे. कसोटीत राहुल भारतासाठी नियमितपणे सलामी फलंदाज म्हणून खेळतो. मात्र दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत त्याला यष्टिरक्षणाची भूमिकाही पार पाडावी लागत आहे. तसेच तो  पाचव्या स्थानी फलंदाजीस उतरत आहे. कारण शुभमन गिल एकदिवसीय सामन्यात सलामी फलंदाज म्हणून खेळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्याकडून संघाला काय हवे आहे याबाबत संघ व्यवस्थापन स्पष्ट असल्याचे राहुल म्हणाला. ‘‘मी जवळपास दोन वर्षे ही भूमिका पार पाडली आहे. संघाने मला या भूमिकेसाठी पुरेसा वेळ दिला आहे. जेव्हा तुम्हाला कर्णधार आणि प्रशिक्षक यांची साथ मिळते, तेव्हा जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. मी इतर प्रारूपात जे करतो त्याहून ही थोडी वेगळी भूमिका आहे. या भूमिकेमुळे मला आपल्या खेळाला अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत मिळते,’’ असे राहुल म्हणाला.