दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनरचा आफ्रिकेच्या प्रशिक्षक वर्गात समावेश करण्यात आला आहे. माजी प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांच्या हकालपट्टीनंतर एनॉच नक्वे यांना संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. लान्स क्लुजनरने ४९ कसोटी, १७१ वन-डे सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

भारताविरुद्ध ३ टी-२० मालिकेपर्यंतच क्लुजनर प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. आफ्रिकेच्या फलंदाजांना तो मार्गदर्शन करेल. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये क्लुजनरची कामगिरी लक्षात घेता, त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. १५ सप्टेंबरपासून आफ्रिका आणि भारतामध्ये टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

Story img Loader