WPL 2023, MI-W vs UPW-W Eliminator Match Playing 11, Pitch Report : महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महत्वाचा एलिमिनेटर सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा मुकाबला रंगणार आहे. आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांममध्ये मुंबई इंडियन्से विजयी पताका फडकावली आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या तुलनेनं मुंबईचा नेट रनरेट कमी असल्यामुळं त्यांना अंतिम सामन्यात जागा पक्की करता आली नाहीय. मुंबई पाच सामने जिंकून प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. पण मुंबईचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने गुणतालिकेत दिल्लीने अव्वल स्थान गाठलं आहे. मागील सामन्यात मुंबई आरसीबीचा ४ विकेट्स राखून पराभव केला होता. अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं होतं.
दरम्यान, यूपी वॉरियर्सने ८ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय संपादन केला असून गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात यूपीने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात यूपीने विजयाची माळ गळ्यात घातल्याने त्यांना प्ले ऑफ मध्ये प्रवेश करता आला. मात्र, शेवटच्या सामन्यात यपीने दिलेलं १३८ धावांचं लक्ष्य दिल्लीने १७.५ षटक आणि पाच विकेटस् राखून पूर्ण केलं. त्यामुळं यूपीचा या सामन्यात दिल्लीने पराभव केला होता.
हेली मॅथ्यूजने मुंबई इंडियन्ससाठी धावांचा पाऊस पाडला आहे. हेलीने आठ सामन्यांत ३३.१४ च्या सरासरीनं २३२ धावा कुटल्या आहेत. १३१.०७ असा हेलीचा स्ट्राईक रेट आहे. तसंच हेलीने १४.६६ च्या सरासरीनं १२ विकेट्स घेतल्या असून ६.५२ एव्हढी इकॉनोमी आहे. तर अमेलिया केरही जबरदस्त फॉर्ममध्ये असून मागील सामन्यात तिने २७ चेंडूत ३१ धावा केल्या. तसंच ४ षटकांमध्ये २२ धावा देत तीन विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरीही केली. मुंबई इंडियन्ससाठी केरने १२.९२ च्या सरासरीनं १३ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग XI
यास्तिका भाटिया, एस इशाक, अमनज्योत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, सिवर ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्रकर, एच वाय काझी, जिंतीमानी कलिता, इसी वॉंग
यूपी वॉरियर्स संभाव्य प्लेईंग XI
किरण नवगिरे, श्वेता शेरावत, सिमरन शेख, टीएम मेक्ग्रा, डी बी शर्मा, यशश्री, पार्शवी चोप्रा, एलिसा हेली (कर्णधार), सोफी एक्लस्टोन, एस इस्माईल, के अंजली सरवाणी
पिच रिपोर्ट
या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना १५० हून अधिक धावसंख्या फलकावर लावण्यात यश आलं होतं. फलंदाजी आणि गोलंदासाठी दोन्हीसाठी ही खेळपट्टी अनुकूल आहे. मागील पाच सामन्यात पहिल्या इनिंगची १२९ ही सरासरी धावसंख्या राहिली आहे.