WTC 2023 Final, IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा महामुकाबला लंडनच्या ओव्हल मैदानात रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो कसोटी क्रिकेटेमध्ये जगातील चॅम्पियन ठरणार आहे. या सामन्यात भारताची प्लेईंग ११ काय असणार, याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आली नाहीय. विशेषत: शार्दूल ठाकूर, अश्विन, उमेश यादव, जयदेव उनादकट असे खेळाडू आहेत, ज्यांच्याबद्दल अजूनही स्पष्ट भूमिका घेण्यात आली नाहीय.
भारताच्या प्लेईंग ११ चं ‘असं’ आहे समीकरण
टीम इंडिया आज लंडनच्या ओव्हल मैदानात ऑस्ट्रेलियाविरोधात लढत देण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील दहा वर्षांत आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताला किताब जिंकता आला नाही. त्यामुळे एक दशकाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर भारताला आयसीसीच्या टूर्नामेंटमध्ये चॅम्पियन बनण्याची मोठी संधी आहे. मागील दहा वर्षात टीम इंडियाने आयसीसीच्या सर्व मोठ्या टूर्नामेंटमध्ये नॉकआऊट सामन्यांपर्यंत मजल मारली. परंतु, अंतिम सामन्यात टीम इंडियाला अपयश मिळाल्याने आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीय.
भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपात आयसीसी किताब जिंकला होता. यानंतर भारताला तीनवेळा पराभवाचा सामना करावा लागला. तसंच भारताला चारवेळा सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. इंग्लंडमध्ये मोठी मालिका रद्द झाली. ‘द ओव्हल’ १४३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जूनमध्ये कसोटी सामन्याचं यजमानपद घेत आहे. भारत रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा या अनुभवी फिरकीपटूंबाबत उत्सुक आहे. परंत, इंग्लंडमध्ये उन्हाळ्याचा हंगाम आहे आणि येथील खेळपट्टीवर चौथा वेगवान गोलंदाज चांगला विकल्प ठरू शकतो.
के एस भरत किंवा ईशान किशन
विकेटकीपर ऋषभ पंतच्या अनुपस्थित भारतीय संघाला निर्णय घ्यावा लागेल की, त्यांना ईशान किशनच्या रुपात एक्स फॅक्टर (सामन्याचा रुप बदलणारा खेळाडू) पाहिजे. किंवा के एस भरतच्या रुपात अधिक विश्वासू विकेटकीपर.
शार्दूल किंवा आश्विन
रोहितने पत्रकार परिषदेत म्हटलं की, प्लेईंग ११ चा शेवटचा निर्णय सामन्याच्या दिवशी परिस्थितीला पाहून दिला जाईल. खेळपट्टी अनुकूल असेल तर शार्दूल खेळू शकतो. तसंच हवामानही खेळण्यासाठी अनुकूल राहिलं तर भारतीय संघ दोन फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतो.
मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी
वेगवान गोलंदाजांच्या लिस्टमध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या विकल्पाच्या रुपात अनुभवी उमेश यादव आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला सामील करु शकतात.