Most Maiden Overs In IPL : टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चर्चा चौकार आणि षटकारांची होत असते. कारण या आधुनिक क्रिकेटच्या युगात फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. पण अनेकदा गोलंदाजही संधीचं सोनं करतात आणि फलंदाजांना नाकीनऊ आणतात. अशाच प्रकारे काही गोलंदाजांनी भेदक मारा करून टी-२० क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर फेकल्या आहेत. गोलंदाजांच्या या मेडन ओव्हर्समुळे सामना अटीतटीचा होण्यास मदत मिळते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त मेडन ओव्हर्स टाकणाऱ्या गोलंदाजांची नोंद करण्यात आलीय. जाणून घेऊयात या गोलंदाजांबाबत सविस्तर माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवीण कुमार : स्विंग गोलंदाजीच्या जोरावर प्रवीण कुमारने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. प्रवीण कुमारने आयपीएलमध्ये सर्वात जास्त मेडन ओव्हर्स फेकल्या आहेत. गोलंदाजीचा भेदक मारा करून प्रवीणने आयपीएल करिअरमध्ये ११९ सामन्यांमध्ये ४२०.४ षटक फेकले आहेत. यामध्ये १४ मेडन ओव्हर्सचा समावेश आहे. तसंच प्रवीणने ९० विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरीही केली आहे.

इरफान पठान

टीम इंडियाच्या सर्वात उमद्या खेळांडूपैकी एक समजल्या जाणाऱ्या इरफान पठाननेही आयपीएलमध्ये चमकदार अष्टपैलू कामगिरी केली आहे. इरफान पठानने आयपीएलमध्ये १०३ सामन्यांमध्ये ३४०.३ षटक फेकले आहेत. यापैकी १० ओव्हर्स पठानने मेडन फेकले आहेत. याशिवाय इरफान पठाने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये ८० विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.

नक्की वाचा – IPL मध्ये भोपळाही फोडला नाही! १४ वेळा शून्यावर झाले बाद; ‘या’ दोन दिग्गज फलंदाजांच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

धवल कुलकर्णी

मुंबईच्या मैदानात आपल्या गोलंदाजीला धार देणाऱ्या भारताचा माजी वेगवाना गोलंदाज धवल कुलकर्णीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कमाल केली आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त मेडन ओव्हर्स टाकण्याच्या लिस्टमध्ये धवल तिसऱ्या स्थानावर आहे. धवलने आयपीएलमध्ये ८ मेडन ओव्हर्स फेकल्या आहेत. तसंच धवलने ९० सामन्यांमध्ये २९०.५ षटक फेकले असून ८६ विकेट्स घेतल्या आहेत.

लसिथ मलिंगा

आयपीएलच्या १२ वर्षात एखादा गोलंदाज यशस्वी झाला असेल, तर तो श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. मलिंगाच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात जास्त १८० विकेट्स आहेत. याशिवाय लसिथने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये १२२ सामन्यांमध्ये ४७१.१ षटक फेकले आहेत. यामध्ये ८ मेडन ओव्हर्सचा समावेश आहे.

संदीप शर्मा

भारताचा एक असा गोलंदाज ज्याने स्विंग चेंडू फेकून आयपीएलमध्ये फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते. संदीप शर्मा मैदानावर भेदक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये संदीपने ७९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २९०.५ षटक फेकले आहेत. यामध्ये ८ मेडन ओव्हर्सचा समावेश असून संदीपने ९५ विकेट्सही घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about top 5 bowlers who bowled most maiden overs in ipl praveen kumar lasith malinga irfan pathan sandeep sharma dhaval kulkarni nss