IND vs SA 1st T20 highlights : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. सामन्याच्या पूर्व संध्येला कर्णधार के एल राहुल आणि फिरकीपटू कुलदीप यादव जखमी झाल्याने मालिकेतून बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे देण्यात आले होते. हा सामना दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून जिंकला आहे. डेव्हिड मिलर आणि रॅसी वॅन डरड्युसेनच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर आफ्रिकेने भारताचा पराभव केला. भारताने आपल्या डावात चार बाद २११ धावांचे आव्हान आफ्रिकेला दिले होते. या पराभवामुळे भारतीय संघ सलग १३ विजयांचा विश्वविक्रम करू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकन संघाने धावफलकावर २०० धावा लावल्या आहेत. विजयासाठी १२ चेंडूंमध्ये १२ धावांची आवश्यकता.
हर्षल पटेलने टाकलेले १७वे षटक काहीसे महागडे ठरले. आफ्रिकेने या षटकात २२ धावा लुटल्या.
ड्युसेनने ३७ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांतील त्याचे हे सातवे अर्धशतक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले आहे. चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा मिलर आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स संघाकडून खेळला होता.
भारताने दिलेल्या २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आफ्रिकन संघाने शतक धावफलकावर लावले आहे. ११ षटकांनंतर दक्षिण आफ्रिका तीन बाद १०६, अशा स्थितीत.
https://platform.twitter.com/widgets.js1ST T20I. 11.6: Harshal Patel to David Miller 6 runs, South Africa 106/3 https://t.co/lJK64DXqh8 #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 9, 2022
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्ष क्विंटन डी कॉक २२ धावा करून माघारी परतला आहे. १० षटकांनंतर आफ्रिकेच्या संघाने ३ बाद ८६ धावांपर्यंत मजल मारली आहे.
हर्षल पटेलने ड्वेन प्रिटोरिअसला आपल्या पहिल्याच षटकात त्रिफळाचित केले. प्रिटोरिअसने २९ धावा केल्या.
पहिल्या पाच षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने एक बाद ६० धावांपर्यंत मजल मारली आहे. यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक आणि ड्वेन प्रिटोरिअस मैदानावर उपस्थित आहेत.
दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला गडी बाद झाला आहे. कर्णधार टेम्बा बावुमा १० धावा करून बाद झाला आहे. भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर यष्टीरक्षक ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला.
https://platform.twitter.com/widgets.js1ST T20I. WICKET! 2.2: Temba Bavuma 10(8) ct Rishabh Pant b Bhuvneshwar Kumar, South Africa 22/1 https://t.co/lJK64Ef1FI #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 9, 2022
दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाली आहे. भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
https://platform.twitter.com/widgets.js1ST T20I. 18.6: Kagiso Rabada to Hardik Pandya 4 runs, India 202/3 https://t.co/lJK64Ef1FI #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 9, 2022
भारतीय संघाचा धावफलक २०० पार गेला आहे. कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या धावफलक हालता ठेवत आहेत.
श्रेयस अय्यर ३६ धावा करून बाद झाला. त्याच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला आहे. अय्यर बाद झाल्यानंतर आता आयपीएल विजेता कर्णधार हार्दिक पंड्या मैदानावर दाखल झाला आहे.
सलामीवर ईशान किशनच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने १५ षटकांनंतर दोन बाद १५० धावांपर्यंत मजल मारली आहे. श्रेयस अय्यर आणि कर्णधार ऋषभ पंत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.
https://platform.twitter.com/widgets.js1ST T20I. WICKET! 12.6: Ishan Kishan 76(48) ct Tristan Stubbs b Keshav Maharaj, India 137/2 https://t.co/lJK64Ef1FI #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 9, 2022
भारताचा स्फोटक सलामीवीर ईशान किशन ७६ धावांची वादळी खेळू करून बाद झाला. त्यापूर्वी, त्याने गोलंदाज केशव महाराजला सलग दोन षटकार आणि दोन चौकार लगावले होते.
https://platform.twitter.com/widgets.jsFIFTY! A well made half-century by @ishankishan51 off 37 deliveries.His 3rd in T20Is.Live - https://t.co/YOoyTQmu1p #indvsa @Paytm pic.twitter.com/RdQxXQslAq
— BCCI (@BCCI) June 9, 2022
भारतीय डावाची सुरुवात करणाऱ्या ईशान किशनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ३७ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये हे ईशानचे तीसरे अर्धशतक ठरले. दरम्यान, भारतीय संघाने दहा षटकांमध्येच धावफलक शंभरीपार नेला आहे.
सलामीवीर ऋतुराज गायकवाडला वेन पार्नेलने माघारी पाठवले आहेत. गायकवाडने १५ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या.
पावर प्लेमध्ये भारताने धावफलकावर आपले अर्धशतक लावले आहे.
https://platform.twitter.com/widgets.jsThat's a 50-run partnership between #teamindia openers - Ishan Kishan & Ruturaj Gaikwad.Live - https://t.co/YOoyTQmu1p #indvsa @Paytm pic.twitter.com/vyLUWstyFS
— BCCI (@BCCI) June 9, 2022
पहिल्यांदाच एकत्र सलामीला आलेल्या ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. दोघांनी चौफेर फटकेबाजी सुरू केली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. सलामीवीर ईशान किशान आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले आहेत.
भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल.
आफ्रिकन संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, वेन पार्नेल.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यामुळे भारताला अगोदर फलंदाजी करावी लागणार आहे.
https://platform.twitter.com/widgets.js1ST T20I.South Africa won the toss and elected to field. https://t.co/lJK64Efzvg #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 9, 2022