IPL Auction 2024 CSK Team Players List : आयपीएल २०२४ चा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. या लिलावात एकूण ७२ खेळाडू विकले गेले, ज्यासाठी सर्व संघांनी एकूण २३० कोटी रुपये खर्च केले. यावेळच्या आयपीएल लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली लावली गेली आणि सर्वात महागडा खेळाडू विकत घेण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेल स्टार्कला २४.७५ कोटींची विक्रमी बोली लावत खरेदी केले, तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला २०.५० कोटी रुपयांना आपल्या सामील केले.

या लिलावात दोन सर्वात महागड्या खेळाडूंनंतर तिसरा सर्वात महागडा खेळाडू न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिशेल ठरला, ज्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने १४ कोटी रुपयांना विकत घेतले. दरवेळेप्रमाणे यावेळीही महेंद्रसिंग धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जसाठी लिलाव चांगला राहिला. त्याने आपल्या संघातील त्या खेळाडूंची जागा भरली, जे आयपीएल २०२३ मध्ये चॅम्पियन बनवून बाहेर पडले.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
On Monday December 9 price of gold rise three times in four hours from morning
सोन्याच्या दरात चार तासात तीनदा बदल, हे आहेत आजचे दर…

या लिलावात सीएसकेला काही उत्तम सौदे करण्याची संधी मिळाली, परंतु चेन्नई संघानेही काही सर्वोत्तम खेळाडूंना खरेदी करण्याची संधी गमावली. आयपीएल २०२४ च्या लिलावानंतर धोनीच्या नेतृत्वाखालील संघ किती मजबूत किंवा कमकुवत बनवला याबद्दल जाणून घेऊया.सीएसकेने या लिलावात एकूण ३०.४० कोटी रुपये खर्च केले, तरीही त्यांच्या पर्समध्ये एकूण एक कोटी रुपये शिल्लक आहेत. एवढ्या पैशात चेन्नई संघाने ६ खेळाडू खरेदी केले असून त्यात ३ विदेशी आणि ३ भारतीय खेळाडू आहेत.

हेही वाचा – IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदासाठी शुबमन गिल किती योग्य आहे? आशिष नेहराने उघडपणे सांगितले

चेन्नई सुपर किंग्जची ताकद –

फिरकी गोलंदाजीसाठी चेन्नईकडे महिष तिक्षाना तसेच रवींद्र जडेजा, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी, निशांत सिंधू, अजय मंडल आहेत. याचा स्पष्ट अर्थ या संघात फिरकी गोलंदाजांची कमतरता नाही. वेगवान गोलंदाजीसाठी नवोदित मुस्तफिझूर रहमान आणि शार्दुल ठाकूर तसेच दीपक चहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगरगेकर आणि डॅरिल मिशेल असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी सर्वच मजबूत आहे.

चेन्नई सुपर किंग्जची कमजोरी –

मात्र, अजूनही चेन्नई सुपर किंग्जमध्ये एकही वेगवान गोलंदाज नाही. या संघात दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांना खरेदी करण्यासाठी बोली लावण्यात आली होती. पॅट कमिन्स त्यांच्या बजेटच्या बाहेर गेला, परंतु कोएत्झीला मुंबईने केवळ ५ कोटी रुपयांना विकत घेतले, जो चेन्नईसाठी कदाचित योग्य ठरला असता, जर त्यांनी मुस्तफिझूर रहमानच्या जागी त्याला संघात समाविष्ट केले असते. १४५-१५० च्या वेगाने चेंडू स्विंग करू शकेल असा एकही गोलंदाज चेन्नईकडे नाही, ही एक कमतरता असू शकते. या व्यतिरिक्त चेन्नईला या लिलावात धोनीचा बदली कर्णधार सापडला नाही, जो कदाचित आयपीएल २०२४ मध्ये शेवटचा हंगाम खेळेल.

हेही वाचा – IPL Auction 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या रणनीतीवर माजी कर्णधाराने केले प्रश्न उपस्थित, सांगितली संघातील सर्वात मोठी कमतरता

सीएसकेने लिलावात खरेदी केलेले खेळाडू –

चेन्नई सुपर किंग्जने २०२४ च्या आयपीएल लिलावात ६ खेळाडूंना खरेदी केले. शार्दुल ठाकूर (४ कोटी), रचिन रवींद्र (१.८० कोटी), डॅरिल मिशेल (१४ कोटी), समीर रिझवी (८.४० कोटी), मुस्तीफिजूर रहमान (२ कोटी), अरावेली अवनीश (२ कोटी).

चेन्नई सुपर किंग्जचे १९ कायम ठेवलेले खेळाडू –

अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिश तीक्शान, महिषा पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हांगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, राजेंद्र हंजे, तुषार देशपांडे.

Story img Loader