विराट कोहली
भारताचा सध्याचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली दिल्लीमधून फक्त १२ वी पर्यंत शिकलेला आहे.

 

ms dhoni
महेंद्रसिंह धोनी आतापर्यंत भारताचा सर्वाधीक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. ‘माही’ या नावाने प्रसिद्ध असलेला धोनीचं शिक्षण बी.कॉम पर्यंत झालेलं आहे.

 

पांड्याने धावबाद होण्यापूर्वी ४६ चेंडूत ७६ धावांची खेळी केली
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात पांड्याने केलेली खेळी सर्वांनाच लक्षात आहे. मात्र हाच स्फोटक फलंदाज शालेय जिवनात ९ वीत नापास झाला आहे, त्यानंतर पांड्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायला शिक्षण सोडलं होतं.

 

icc champions trophy 201, india,sri lanka, shikhar dhawan
भारतीय टीमचा ‘गब्बर’ म्हणजेच शिखर धवनने केवळ १२ वी पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासून शिखर धवनने क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे.

 

Ravichandran Ashwin
भारताच्या फिरकी गोलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या रविचंद्रन अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉर्म्समध्ये चोख कामगिरी बजावली आहे. अश्विनने माहिती व तंत्रज्ञान विषयात चेन्नईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘बॅचलर इन टेक्नोलॉजी’ ही पदवी घेतली आहे.

 

D
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करणारा रोहीत शर्माही केवळ १२ वी पर्यंत शिकलेला आहे. त्याचं क्रिकेटमधलं कौशल्य पाहता रोहीतचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहीतला स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये अॅडमिशन घेण्याचा सल्ला दिला होता.

 

D
भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहनेही डी.ए.व्ही. पब्लिक स्कूलमधून आपलं १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. १२ वी नंतर त्याच्या वडीलांच्या सल्ल्याप्रमाणे युवराजने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

 

शमीसोबत भुवनेश्वर कुमार संघात खेळताना दिसून येण्याची शक्यता आहे.
भुवनेश्वर कुमारने आपलं शालेय शिक्षण मीरत शहरातून पुर्ण केलं आहे. वयाच्या १३ व्या वर्षी भुवनेश्वरची बहिणी रेखाने त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.

 

सुरेश रैनाचे देखील एकदिवसीय संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळे रैनाच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल.
शालेय शिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या सुरेश रैनाने दिल्ली विद्यापीठातून बी.कॉमपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीत ट्रेनिंग घेण्यासाठी रैनाची मानाच्या बॉर्डर-गावसकर शिष्यवृत्तीसाठीही निवड झाली होती.

 

सचिनने ४ जानेवारी या एकाच तारखेला ठोकलेल्या या शतकांचा योगायोग देखील एका अनोख्या विक्रमाची नोंद करणारा ठरला.
मैदानात धावांचा रतीब घालणाऱ्या सचिन तेंडुलकरची अभ्यासात मात्र काहिशी बोंब होती. क्रिकेटची आवड फार लहान वयात सचिनला अभ्यासापासून लांब घेऊन आली. तरीही सचिनने १२ वी पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

 

गौतम गंभीर (संग्रहित छायाचित्र)
‘गौती’ या नावाने ओळखला जाणाऱ्या टीम इंडियाचा ह्या सलामीच्या फलंदाजाने मॉर्डन स्कूल मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर गंभीरने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातून आपलं पदवीचं शिक्षण पुर्ण केलंय.

 

Zaheer Khan, Cricket, Team India, Indian bowlers, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
झहीर खान आपल्या शैक्षणिक जिवनात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. झहीरने इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला होता, मात्र क्रिकेटची आवड त्याला शिक्षणापासून लांब घेऊन गेली.

Story img Loader