How many times India vs Australia match face in ODI World Cup History: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत अप्रतिम कामगिरी केली. मात्र, ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नसली, तरी त्याने सलग आठ सामने जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारत आण दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभव पत्कारावा लागला होत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक असतो, पण विश्वचषकात हे दोन संघ किती वेळा भिडले आणि कोणी किती वेळा विजय मिळवला आहे, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया –

भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या इतिहासात एकूण १३ वेळा आमनेसामने आले आहेत. या १३ विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले असून भारताला केवळ ५ सामन्यात विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये विश्वचषकातील एकही सामना टाय किंवा रद्दही झालेला नाही. विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ३५९ धावा आहे.

पहिला सामना १३ जून १९८३ रोजी खेळला गेला –

त्याचबरोबर विश्वचषकाच्या इतिहासात भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ३५२ धावा आहे. तसेच भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची सर्वात कमी धावसंख्या १२८ धावा असून भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्द सर्वात कमी धावसंख्या १२५ धावा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय विश्वचषकातील पहिला सामना १३ जून १९८३ रोजी खेळला गेला होता, जो ऑस्ट्रेलियाने १६२ धावांनी जिंकला होता.

हेही वाचा – IND vs AUS Final: विराट, रोहित किंवा शमी नव्हे, तर ‘हा’ खेळाडू फायनलमध्ये ठरणार ‘गेम चेजर’, गौतम गंभीरने सांगितले नाव

तसेच भारताने १९८३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धही सर्वात मोठा विजय नोंदवला होता, तो ११८ धावांनी जिंकला होता.या दोन्ही संघातील शेवटचा विश्वचषक सामना या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी खेळला गेला होता, जो भारताने ६ गडी राखून जिंकला होता. ही आकडेवारी पाहता विश्वचषकात भारतावर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे, पण या विश्वचषकात भारतीय संघाचा फॉर्म उत्कृष्ट आहे, हे स्पष्ट होते. आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माचा संघ ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवू शकतो का, हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know how many times india vs australia match face in odi world cup history head to head statistics vbm
Show comments