India Reserve Day Record: कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया कप २०२३ च्या सुपर फोर टप्प्यातील भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना १० सप्टेंबर (रविवार) रोजी होणार होता, परंतु त्या दिवशी पावसामुळे सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलावा लागला. भारत सध्या भक्कम स्थितीत असला तरी, पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातील राखीव दिवसातील त्याचा भूतकाळातील विक्रम निश्चितच चिंता वाढवणारे संकेत देत आहे.

भारत यापूर्वी चार वेळा राखीव दिवशी सामना खेळला आहे. वनडेमध्ये तीनदा आणि कसोटीत एकदा. १९९९ च्या विश्वचषकात पहिल्यांदाच भारताचा इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे राखीव दिवसासाठी हलवण्यात आला होता. भारतीय संघाने हा सामना ६३ धावांनी जिंकला होता. तीन वर्षांनंतर, कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ ची फायनल पावसामुळे राखीव दिवसापर्यंत पोहोचली होती. मात्र, राखीव दिवशीही पाऊस सुरूच होता. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. यानंतर भारत आणि श्रीलंकेच्या संघांना ट्रॉफी विभागून घ्यावा लागली होती.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ
India vs South Africa 1st T20 Live Updates in Marathi
IND vs SA 1st T20 Highlights: दक्षिण आफ्रिका ऑलआऊट, भारताचा पहिल्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय

२०१९ मध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच झाला होता पराभव –

पुढील वेळी भारत १७ वर्षांनंतर २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धचा सामना राखीव दिवसात गेला होता. भारतीय क्रिकेट संघाने राखीव दिवशी सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. हा सामना भारतीय क्रिकेटमधील सर्वात वाईट घटनांपैकी एक मानला जातो. तो सामना एमएस धोनीचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

हेही वाचा – Asia Cup: कोलंबो येथील भारत-पाक सामन्यातील पावसाने करून दिली २००२ ची आठवण, जाणून घ्या काय झाले होते?

त्यानंतर दोन वर्षांनंतर, विश्वचषक २०१९ च्या उपांत्य फेरीची पुनरावृत्ती झाली. यजमान इंग्लंड होते आणि प्रतिस्पर्धी एकच होते आणि निकालही तोच होता. २०२१ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाहून गेला होता, त्यामुळे सामना सहाव्या दिवशीही म्हणज राखीव दिवशीही सुरू होता. भारताने हा सामना ८ विकेट्सने गमावला होता.

हेही वाचा – IND vs PAK: “माझे फक्त एकच ध्येय आहे की भारताला…”; पाकिस्तानविरुद्धच्या अर्धशतकानंतर शुबमन गिलने केला खुलासा

टीम इंडियाने ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला –

वरील सर्वा माहितीच्या आधारे भारतीय संघाचा राखीव दिवसातील सामन्यांचा विक्रम चांगला नाही, असे म्हणता येईल. मात्र, पाऊस थांबला आणि सामना खेळला गेला, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विजयासह परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना दिसेल. कारण भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा अशी धावसंख्या आहे.