Australia vs India ODI Series Schedule Updates: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले. त्याचबरोबर आठव्यांदा आशियाई चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. आशियाई चॅम्पियन बनल्यानंतर आता टीम इंडियाचा सामना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक आणि इतर गोष्टी जाणून घेऊया.

या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने रविवारीच आपला संघ जाहीर केला होता. या मालिकेद्वारे पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श हे मैदानात परततील. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान दुखापत झालेला ट्रॅव्हिस हेड संघाबाहेर गेला आहे.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Border Gavaskar Trophy Josh Hazlewood statement
Border Gavaskar Trophy : ‘क्लीन स्वीपने झोपी गेलेला संघ जागा होईल…’, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचे भारताबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, आम्ही पण…

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगणार तीन सामन्यांची मालिका –

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. दुसरीकडे कांगारू संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात मालिका गमावावी लागली.या मालिकेत आफ्रिकन संघाने एकदिवसीय मालिका ३-२ च्या फरकाने जिंकवला. या मालिकेत मिचेल मार्शने कांगारू संघाचे नेतृत्व केले होते, पण पहिले सलग दोन सामने जिंकल्यानंतर प्रोटीज संघाने शेवटच्या सलग तीन सामन्यांमध्ये या संघाचा पराभव केला. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मार्श संघाचा भाग आहे, मात्र तो संघाचा कर्णधार असणार नाही. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची धुरा पॅट कमिन्सच्या खांद्यावर असणार आहे.

हेही वाचा – Asia Cup Final: ‘…म्हणून रोहितने सिराजला जास्त षटकं टाकू दिली नाहीत’; सामन्यानंतर हिटमॅनने केला खुलासा, जाणून घ्या कारण

एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या मालिकेदरम्यान टीम इंडिया आपल्या तयारीची आणि खेळाडूंची पूर्ण चाचणी घेऊ इच्छित आहे. ही मालिका २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून दुसरा सामना २४ सप्टेंबरला होणार आहे.

या वनडे मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया पुन्हा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार आहे. भारतीय संघाला या एकदिवसीय विश्वचषकात पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी पाच वेळा एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.

हेही वाचा – IND vs SL: फायनलमधील पराभवानंतर दासून शनाकाच्या ‘या’ शब्दांनी जिंकली श्रीलंकन चाहत्यांची मनं, जाणून घ्या काय म्हणाला?

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे पूर्ण वेळापत्रक –

पहिला एकदिवसीय सामना – २२ सप्टेंबर – मोहाली – दुपारी ३ वा.
दुसरा एकदिवसीय सामना- २४ सप्टेंबर- इंदूर – दुपारी ३ वा.
तिसरा एकदिवसीय सामना- २७ सप्टेंबर- राजकोट – दुपारी ३ वा.

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.