What is Umair Jaswal’s relationship with Shoaib : भारतीय टेनिसपटू आणि पत्नी सानिया मिर्झापासून विभक्त झाल्याच्या बातम्यांदरम्यान, माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. मलिकने स्वतः इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाची बातमी येताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. दरम्यान, सानियासह आणखी एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे उमैर जसवाल. हा उमैर जसवाल कोण आहे आणि शोएबच्या लग्नाशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहे उमैर जसवाल?
खरे तर सना जावेदचे यापूर्वी एकदाच लग्न झाले आहे. सना जावेदने २०२० मध्ये गायक उमैर जसवालसोबत लग्न केले होते. पण सना-उमेरचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. उमेर जसवाल हा इस्लामाबादमधील पाकिस्तानी अभिनेता, गायक-गीतकार आणि संगीत निर्माता देखील आहे. तो कायस या रॉक बँडचा प्रमुख गायक आहे.
घटस्फोटापूर्वीच उमीर आणि सना यांनी आपापल्या सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो डिलीट केले होते. सना जावेद पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे, तिच्याकडे ए मुश्त-ए-खाक, डंक आणि इतर अनेक प्रसिद्ध शो आहेत. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.
हेही वाचा – Mohammed Shami : “लग्न करणार आहेस का?” मोहम्मद शमीच्या व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना पडला प्रश्न
घटस्फोट न घेता शोएबने केले दुसरे लग्न –
शोएबबद्दल सांगायचे तर, शोएबने २०१० मध्ये सानियाशी लग्न केले. त्यानंतर आयेशा सिद्दीकी पुढे आली आणि तिने सर्वांना सांगितले की ती शोएबची पहिली पत्नी आहे आणि तिला घटस्फोट दिल्याशिवाय तो पुन्हा लग्न करू शकत नाही. त्यावेळी शोएबने आयेशाचे म्हणणे फेटाळून लावले होते. पण जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा त्याने आयशाला घटस्फोट दिला. सानियासोबत लग्न केल्यानंतर शोएबने पहिली पत्नी आयशा हिला घटस्फोट दिला होता.