U19 World Cup Semi Final 2024 IND vs SA : अंडर-१९ विश्वचषक २०२४ आता शेवटच्या आणि रोमांचक वळणावर पोहोचला आहे. मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील ही चुरशीची लढत बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ कोण असेल हे आजच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद लावतील, अशी आशा आहे.

सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला उपांत्य सामना मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळवला जाईल.

सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक सामन्याच्या ३० मिनिटे आधी म्हणजेच दुपारी १ वाजता होईल.

हेही वाचा – India vs England : ‘या’ पाच कारणांमुळे भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला चारली धूळ

उपांत्य फेरीची सामना कुठे बघता येईल?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्टवर आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचा उपांत्य सामना पाहू शकता. या सामन्याचे थेट प्रसारण डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील केले जाईल, जेथे तुम्ही या सामन्याचा पूर्णपणे विनामूल्य आनंद घेऊ शकता.

भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य –

अंडर-१९ विश्वचषक २०२४ स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. ग्रुप स्टेजपासून सुपर सिक्स पर्यंत कोणत्याही संघाला या स्पर्धेत भारताला हरवता आलेले नाही. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ५ सामने जिंकले आहेत. सुपर सिक्सच्या महत्त्वाच्या सामन्यात संघाने न्यूझीलंडचा २१४ धावांनी तर नेपाळचा १३२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. अशा स्थितीत भारतीय संघ पूर्ण उत्साहात आहे. भारताची ही कामगिरी पाहता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीतही प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – IND vs ENG Test : रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मुशीर खानने पाडला धावांचा पाऊस –

या विश्वचषकात भारतीय संघाचे फलंदाज आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करत आहेत. विशेषत: संघाचा स्टार युवा खेळाडू मुशीर खान याच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत मुशीरने ५ सामन्यात २ शतके आणि १ अर्धशतकाच्या मदतीने ३३४ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीतही मुशीरकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहेत. या सामन्यात मुशीरच्या बॅटने काम केल्यास भारताचा विजय जवळपास निश्चित होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know when and where the u19 world cup 2024 semi final between india and south africa will be played vbm