ICC World Cup 2023 Warm-up Matches Live Streaming: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या आधी सराव सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व १० संघ २-२ सराव सामने खेळणार आहेत. जे आजपासून (29 सप्टेंबर) सुरू होणार आहेत. पहिला सराव सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात गुवाहाटी येथे होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सराव सामना ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. तुम्ही हे सराव सामने कधी, कुठे आणि कसे विनामूल्य पाहू शकता ते जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सराव सामने कधी होणार?

एकदिवसीय विश्वचषकाचे सराव सामने शुक्रवार, २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी तीन सामने होणार आहेत. 3 ऑक्टोबर सराव सामन्यांचा शेवटचा दिवस असणार आहे. चौथ्या आणि शेवटच्या दिवशी फक्त तीन सामने खेळवले जातील आणि उर्वरित दोन दिवस २-२ सामने होतील. सर्व सराव सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २.०० वाजल्यापासून खेळवले जातील.

कुठे होणार सराव सामने?

विश्वचषकाच्या सराव सामन्यांसाठी एकूण तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गुवाहाटीमधील बारसापारा क्रिकेट स्टेडियम आणि तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम या तीन ठिकाणांचा समावेश आहे.

हेही वाचा – VIDEO: विश्वचषकाच्या सराव सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीत दाखल, अक्षर पटेल ऐवजी संघाबरोबर दिसला रविचंद्रन आश्विन

टीव्हीवर कोणत्या चॅनलवर पाहता लाइव्ह सामने?

स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून विश्वचषकाचे सर्व सराव सामने भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील.

लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत कुठे पाहता येणार?

डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपद्वारे सराव सामने विनामूल्य स्ट्रीम केले जातील.

हेही वाचा – World Cup 2023: रोहित, विराट किंवा गिल नव्हे तर ‘हे’ तीन खेळाडू विश्वचषकात भारतासाठी असतील गेम चेंजर्स, युवराज सिंगने केले भाकीत

आज होणार तीन सामने, भारताचे वेळापत्रक कसे आहे?

सराव सामन्यांमध्ये आज पहिला सामना श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (गुवाहाटी), दुसरा दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान (तिरुवनंतपुरम) आणि तिसरा न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (हैदराबाद) यांच्यात होणार आहे. तसेच टीम इंडिया आपला पहिला सराव सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. यानंतर मेन इन ब्लूचा दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध ३ ऑक्टोबरला तिरुअनंतपुरममध्ये होईल.

हेही वाचा – Asian Games: नेमबाजीत टीम इंडियाची घोडदौड कायम! पुरुषांनी सुवर्ण तर महिला संघाने पटकावले रौप्यपदक

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know when where and how to watch the world cup 2023 warm up matches live for free vbm